
New Delhi News : महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील विधानसभेचा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते तिथंही प्रचारात उतरले. भाजपच्या या प्रचाराला जशात तसे उत्तर दिलं जात आहे. रांची पूर्णिया इथले अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी झारखंडमधील चक्रधरपूर इथल्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
"केंद्र सरकारपक्षे जास्त पैसा आपल्याकडे आहे. नऊ हजार बिघा जमीन गरीबांमध्ये वाटली आहे. कोरोना काळात पंतप्रधान खासगी सहाय्यकाला औषध मिळत नव्हते, तेव्हा ते आपण दिले, त्यामुळे माझ्यासमोर मोदींची औकात काय आहे?", अशी टोलेबाजी खासदार पप्पू यादव यांनी केला.
खासदार पप्पू यादव यांनी भाषणात भाजप (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ही टीका करतान त्यांची जीभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औकातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'आपण एकटे संपूर्ण देशाचा उपचार करू शकतो. कोरोना काळात प्रत्येक गरिबाच्या घरी जाऊन पैसे वाटले. मी संपूर्ण देशाला एकटा वागवू शकतो'. मी देशातील प्रत्येक गरीबाला दोन हजार देऊ शकतो. एवढी औकात कोणाची नाही, असे देखील म्हटले.
पप्पू यादव यांनी पुढे असा दावा केला आहे की, कोरोना काळात सात कोटी रुपयांचे रेमडेसिवीर औषध खरेदी केले होते. ही औषधे लोकांमध्ये वाटली. पंतप्रधानांच्या (Narendra Modi) 'पीए'ला देखील औषध मिळत नव्हते. मी त्यांना औषध उपचारासाठी दिली, असे म्हटले.
खासदार यादव यांनी शारद चिटफंड घोटाळ्यावर देखील भाष्य केले. ते म्हणाले, "हिमंत बिस्वा सरमा यांचे नाव पुढे आले होते आणि त्यानंतर सीबीआयने त्यांच्यावर छापे घातले. त्यांची 2014 मध्ये चार तास चौकशीही झाली होती". सरमा आज कोणत्या पक्षात आहेत? असा सवाल दोखील केला.
झारखंडच्या निवडणुकीत पप्पू यादव यांनी केलेल्या या भाषणामुळे चर्चेत आले आहेत. भाजप याची दखल कशी घेते आणि खासदार यादव यांना कसे प्रत्युत्तर देते, याकडे आता लक्ष लागले आहे. पप्पू यादव यांनी भाषण केलेल्या दाव्यांची, वाटलेल्या पैशांची, त्यांच्याकडे एवढा पैसा आहे का, याची चौकशी होऊ शकते, अशी चर्चा आता झारखंडच्या निवडणुकीत रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.