Rahul Gandhi : …Love बोलायचे विसरून गेलो होतो! राहुल गांधींकडून 'तो' टी-शर्ट घालून प्रचार

Rahul Gandhi Campaign in Wayanad: भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधी ‘मोहब्बत की दुकान’ की दुकान हा शब्दप्रयोग करत आहेत. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विरोधकांना यावरून धारेवर धरले होते.  
Priyanka Gandhi, Rahul Gandhi
Priyanka Gandhi, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Wayanad Lok Sabha Bypoll: वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार व बहीण प्रियांका गांधी यांचा राहुल गांधींकडून जोरदार प्रचार केला जात आहे. सोमवारीही त्यांनी रोड शोद्वारे प्रियांका यांच्यासाठी चांगलीच बॅटिंग केली. यादरम्यान बोलताना त्यांनी राजकारणात प्रेम (Love) हा शब्द बोलायचे विसरून गेल्याचे विधान केले आहे.

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेची आठवण यावेळी सांगितली. ते म्हणाले, भारत जोडो यात्रेचा उद्देश राजकीय होतो. पण यात्रेच्या सुरुवातीलाच मी काही हैराण झालो. मी लोकांची गळाभेट घेत होतो, लोक मलाही प्रेम देत होते. मी तुमच्यावर प्रेम करतो, असे मी म्हणायचो. आम्हीही तुमच्यावर प्रेम करतो, असे लोक म्हणायचे.

Priyanka Gandhi, Rahul Gandhi
Ayodhya Ram Temple : अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी; खलिस्तानी दहशतवाद्याचा VIDEO व्हायरल

आज विमानातून प्रवास करताना मला जाणवले की, अनेक वर्षे राजकारणात मी प्रेम शब्दाचा वापरच केला नाही, असे राहुल यांनी सांगितले. वायनाडमध्ये आल्यानंतर मी अचानक राजकारणात प्रेम शब्दाचा वापर सुरू केला, असे राहुल म्हणाले.

राहुल गांधी गांधी यांनी सोमवारी रोड शोदरम्यान ‘आय लव्ह वायनाड’ असे लिहिलेला पांढरा टी-शर्ट घातला होता. ‘मला जाणवले की, वायनाडमधील लोकांना मला प्रेम, स्नेह दिला. माझे संपूर्ण राजकारणच बदलून गेले. राजकारणात प्रेम शब्दाचे खूप महत्व असल्याचे लोकांनी मला शिकवले. म्हणून मी हा टी शर्ट घातल असल्याचे राहुल म्हणाले.

Priyanka Gandhi, Rahul Gandhi
Kamala Harris : पराभवानंतरही कमला हॅरिस होणार राष्ट्राध्यक्ष? अमेरिकेत काय घडतंय?

बहिणीला दिले चॅलेंज

राहुल गांधी यांनी बहीण प्रियांका यांना एक चॅलेंज दिले. ते म्हणाले, मी बहिणीला आव्हान देऊ इच्छितो. तिने वायनाडला सर्वात सुंदर पर्यटनस्थळ बनवावे. जेव्हा लोक केरळविषयी विचार करतील, तेव्हा ते सर्वातआधी वायनाडमध्ये यायला हवेत. यामुळे वायनाडचे लोक आणि येथील अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि जगालाही याची माहिती होईल, अशी अपेक्षा राहुल यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com