Priyanka Gandhi News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिल्यांदाच घेतला मोठा निर्णय; प्रियांका गांधी मिळवून देणार सत्ता?

Congress decision Assam elections : काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवार छाननी समितीचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Rahul Gandhi, Priyanka GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress election strategy : मागील काही वर्षांतील काही अपवाद वगळता काँग्रेस पक्षाला बहुतेक निवडणुकांमध्ये पराभवाचाच सामना करावा लागला आहे. हरियाणा, महाराष्ट्र, बिहार, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. यावर्षी पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आदी राज्यांमध्य विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी आता काँग्रेस सतर्क झाले असून पहिल्यांदाच मोठा निर्णय घेतला आहे.

आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने छाननी समितीची स्थापना केली असून पक्षाचे सरचिटणीस खासदार प्रियांका गांधी यांना या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. त्यामुळे आसामच्या उमेदवार निवड प्रक्रियेत प्रियांका गांधी यांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे छाननी समितीच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील सदस्य नेमण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांपैकी चांगल्या उमेदवारांची क्रमवारी तयार करून ती यादी केंद्रीय निवडणूक समितीकडे सोपवण्याचे काम छाननी समिती करते. छाननी समितीच्या अहवालावर केंद्रीय निवडणूक समिती अंतिम निर्णय घेत असते. आसामच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदी प्रियांका गांधी यांना नेमण्यात आले असून त्यांना मदत करण्यासाठी सप्तगिरी उल्का, इमरान मसूद आणि एस. प्रसाद यांना सदस्य म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Supreme Court : SC, ST, OBC प्रवर्गाला सर्वात मोठा दिलासा; भरती प्रक्रियेतील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

आसाममध्ये गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला(एनडीए) ७५ जागा मिळाल्या होत्या. तर दुसरीकडे काँग्रेस आघाडीला ५० जागा प्राप्त झाल्या होत्या. दोन्ही आघाड्यांची मतांची टक्केवारी क्रमशः ४३.० आणि ४२.३ टक्के इतकी होती.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Supreme Court : SC, ST, OBC प्रवर्गाला सर्वात मोठा दिलासा; भरती प्रक्रियेतील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

दरम्यान, पश्चिम बंगालच्या छाननी समितीचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसने बी. के. हरिप्रसाद यांना नेमले असून त्यांच्या मदतीसाठी मो. जावेद, ममता देवी आणि बी. पी. सिंह यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तमिळनाडू आणि पुदुच्चेरी याठिकाणच्या निवडणुकीसाठी अध्यक्ष म्हणून टी. एस. सिंहदेव यांना नेमण्यात आले आहे. यशोमती ठाकूर, जी. सी. चंद्रशेखर आणि अनिल कुमार यादव यांना सदस्य बनविण्यात आले आहे. केरळच्या छाननी समितीचे अध्यक्ष म्हणून मधुसूदन मिस्त्री यांना नेमण्यात आले असून सैय्यद हुसेन, नीरज डांगी आणि अभिषेक दत्त यांना सदस्य बनवण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com