Assembly Election Results 2023 : मंदिर पॉलिटिक्सचा फंडा; मध्य प्रदेश, राजस्थानात जोरात

Ram Mandir : निवडणुकीच्या आधीपासून भाजपने दोन्ही राज्यांमध्ये हिंदुत्व, राम मंदिर, महाकालेश्वर मंदिर, सनातन धर्म असे मुद्दे उपस्थित करण्यास सुरुवात केली होती.
PM Narendra Modi, Shivraj Singh Chouhan, HM Amit Shah
PM Narendra Modi, Shivraj Singh Chouhan, HM Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Elections Results 2023 : मध्य प्रदेशमध्ये पुन्हा भाजप सत्तेत येण्याची चिन्हे असून, राजस्थानमध्ये काँग्रसेची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश मिळू शकते. दोन्ही राज्यांमध्ये भाजपने प्रचारादरम्यान राम मंदिराचा मुद्दा जोरकसपणे मांडला. वर्षभरापूर्वीच मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये महाकालेश्वर मंदिरात श्री महाकाल लोकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते. त्याचाही मोठा गाजावाजा करण्यात आला. हे मंदिर पॉलिटिक्सही दोन्ही राज्यांतील भाजपच्या विजयात महत्त्वाचे ठरल्याची चर्चा आहे. (Five State Assembly Elections Result in Marathi)

राजस्थानमध्ये (Rajasthan Assembly Election) प्रत्येक पाच वर्षांनी सत्ताबदल होत असला तरी मध्य प्रदेशात (Madhya Pradesh Assembly Election) भाजपने पुन्हा सत्ता मिळवत इतिहास घडवणार आहे. मध्य प्रदेश हा भाजपचा (BJP) गड मानला जातो. या राज्यात १५ महिन्यांचा काळ वगळता २००३ पासून भाजपची सत्ता आहे. यावेळच्या निवडणुकीच्या आधीपासून भाजपने दोन्ही राज्यांमध्ये हिंदुत्व, राम मंदिर (Ram Mandir), महाकालेश्वर मंदिर, सनातन धर्म असे मुद्दे उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. राम मंदिराचे होर्डिंग लावण्यात आले होते. त्याची काहीशी झलक निवडणूक निकालांमध्ये दिसत आहे.

PM Narendra Modi, Shivraj Singh Chouhan, HM Amit Shah
Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : राजस्थान-मध्य प्रदेशात भाजपचं निर्विवाद वर्चस्व; काँग्रेसला चिंतनाची गरज!

दोन्ही राज्यांमधील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्वच नेत्यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. राम मंदिरावरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून ‘मंदिर वही बनायेंगे, तारीख नहीं बतायेंगे’ असा खोचक टोला भाजपला लगावला जात होता, पण या निवडणुकीआधी हे मंदिर २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाविकांसाठी खुले केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. तोच मुद्दा हाताशी धरत भाजपच्या नेत्यांनी ‘मंदिर भी बनाया, तारीख भी बताई’ असा पलटवार केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमित शाह यांनी तर सत्ता आल्यास भाविकांना मंदिरात मोफत प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा करून टाकली होती. त्यावरून भाजपसाठी राम मंदिराचा मुद्दा किती महत्त्वाचा हे स्पष्टपणे दिसून आले. मध्य प्रदेशातील महाकाल लोक परिसराच्या उद्घाटनाचा मोठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. त्याचाही परिणाम निवडणुकीत दिसून आल्याचे विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.

PM Narendra Modi, Shivraj Singh Chouhan, HM Amit Shah
Telangana Chhattisgarh Assembly Results : बीआरएसच्या गडाला सुरुंग; काँग्रेसनं तेलंगणा खेचलं; छत्तीसगडची सत्ता गमावली!

यामध्ये काँग्रेसही मागे नव्हते. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढत सत्ता आल्यास श्रीलंकेत सीता माता मंदिराच्या उभारणीचा कार्यक्रम पुन्हा सुरू केला जाईल, भगवान परशुरामांचे जन्मस्थान असलेल्या ठिकाणाला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते, पण त्याचा परिणाम मतदारांवर अजिबात झाला नाही, असे दिसते.

(Edited By - Rajanand More)

PM Narendra Modi, Shivraj Singh Chouhan, HM Amit Shah
Assembly Elections Vote Results 2023: मध्य प्रदेशमध्ये फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या पथ्यावर ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com