Assembly Elections Results 2023 : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपचा दणदणीत विजय; काँग्रेसने EVMवर फोडले खापर

Assembly Elections Results in Marathi : विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे आणि आता निकाल लागत आहेत...
Assembly Elections Results 2023
Assembly Elections Results 2023Sarkarnama
Published on
Updated on

2023 Assembly Elections Results in Marathi : मध्य प्रदेशसह राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होताना दिसतोय, तर तेलंगणामध्ये बीआरएसचा पराभव करून काँग्रेसची सत्ता येताना दिसतेय. पण तीन राज्यांमध्ये झालेल्या मोठ्या पराभवाचे खापर काँग्रेसने ईव्हीएम मशिनवर फोडले आहे. काँग्रेसने ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला आहे. ईव्हीएम हटवायला हवे आणि त्यावर चर्चा करण्याची गरज आहे, असे काँग्रेसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

Assembly Elections Results 2023
Assembly Elections Results 2023 : मध्य प्रदेशात केंद्रीय मंत्र्यांची हार; गृहमंत्रीही पराभवाच्या छायेत

ईव्हीएमवर चिंतन करण्याची गरज आहे, आम्ही सातत्याने सांगत आलोय. बहुतेक राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशात लोकशाही टिकवण्यासाठी ( Assembly Elections Results 2023 ) ईव्हीएम हटवणे आणि त्यावर चर्चा करण्याची गरज आहे. जनतेचे मत वेगळे आणि निकाल येऊ लागतात तेव्हा ईव्हीएम वेगळा सांगते. यामुळे यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे, असे यूपी काँग्रेसचे प्रवक्ते अंशू अवस्थी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर प्रश्न शंका उपस्थित केल्या आहेत. ईव्हीएम विरोधात अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाचा दरवाजाही ठोठावला आहे. ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदानाची प्रक्रिया व्हावी, असे काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी दोन महिन्यांपूर्वी म्हटले होते. ( Five State Assembly Elections Result in Marathi ) ईव्हीएम एक मिशन आहे. कुठल्याही इतर मशिनप्रमाणेच ईव्हीएमसोबतही छेडछाड होऊ शकते, असे तिवारी म्हणाले होते.

भाजपनेही केला होता EVMला विरोध?

विशेष म्हणजे भाजपने यापूर्वी ईव्हीएमला विरोध केला होता. भाजपचे नेते जीव्हीएल नरसिम्हाराव यांनी त्यावर पुस्तकही लिहिले आहे. ईव्हीएममुळे भारतातील लोकशाही कशी धोक्यात आहे, यावर Democracy At Risk! हे पुस्तक लिहिले आहे. जीव्हीएल नरसिम्हाराव हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. ईव्हीएमवरील त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते झाले होते. ईव्हीएमवर शंकेची सुरुवात येथूनच झाली होती. त्यावेळी काँग्रेस निवडणुका जिंकत होती आणि भाजप विरोधी पक्षात होता. आता भाजप निवडणुका जिंकत आहे. त्यामुळे ईव्हीएमवर शंका घेणारेही बदलत आहेत.

Democracy At Risk!
Democracy At Risk!

५ वाजेपर्यंतचा मतमोजणीचा कल, कुणाला किती जागा?

मध्य प्रदेश

एकूण जागा- २३०

भाजप - १६६

काँग्रेस - ६३

इतर - १

राजस्थान

एकूण जागा- १९९

भाजप - ११५

काँग्रेस - ७०

इतर - १४

छत्तीसगड

एकूण जागा- ९०

भाजप - ५३

काँग्रेस - ३७

इतर - ००

तेलंगणा

एकूण जागा- ११९

काँग्रेस - ६८

बीआरएस - ३५

भाजप - ९

एमआयएम - ७

Assembly Elections Results 2023
Rajasthan Assembly Election : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी वसुंधरा राजे की 'योगी'...; भाजप पुन्हा धक्कातंत्र वापरणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com