Maharashtra Election Result : महाराष्ट्रात काय घडलं? थेट राजीव कुमार यांनीच दिले राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Election Commission of India CEC Rajiv Kumar Congress Leader Rahul Gandhi : दिल्ली निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याआधी राजीव कुमार यांनी सर्व आरोप खोडून काढले.
Rahul Gandhi, Rajiv Kumar
Rahul Gandhi, Rajiv KumarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीसह देशभरातील विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. त्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधीही आघाडीवर होते. हे सर्व आरोप मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी खोडून काढले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याआधी राजीव कुमार यांनी आयोगावर झालेल्या सर्व आरोपांवर भाष्य केले. सायंकाळी मतदानात अचानक झालेली वाढ, 50 हजारांहून अधिक मतदान वाढलेल्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी, मतदारयादीतील नावे वगळणे व नव्याने समाविष्ट करणे, अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तरपणे बाजू मांडली.

Rahul Gandhi, Rajiv Kumar
Yogi Adityanath : लोकसभेतील पराभवानंतर योगींची प्रतिष्ठा पुन्हा पणाला; अयोध्येत निवडणुकीची घोषणा

शक का इलाज हकीम के पास भी नहीं होता, या शायरीतून राजीव कुमार यांनी टीकाकारांना उत्तर दिले. ते म्हणाले, मतदानासाठी ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहे. सुप्रीम कोर्टाने 42 वेळा म्हटले आहे की, ईव्हीएमला हॅक करता येऊ शकत नाही. पोलिंग अधिकारी ईव्हीएम सील करतात. त्यावेळी सर्व पक्षांचे एंजट असतात. अशावेळी कसलीही चूक होण्याची शक्यताच नाही.

मतदानाच्या टक्केवारीवर काय म्हणाले?

मतदानाची टक्केवारीवरून होत असलेल्या आरोपांवर बोलताना राजीव कुमार म्हणाले, मतदानादिवशी सकाळी 11.30, 1.30, 3.30, आणि 5.30 वाजता अधिकारी सर्व मतदान केंद्रांवर जातात. तेथील ट्रेंड्सची माहिती घेतात. कोणत्याही कनेक्शनशिवाय 10.5 लाख बूथवरील आकडे संकलित केले जात असताना सायंकाळी सहा वाजता मतदानाचा अंतिम आकडा कसा समजेल? आम्ही जर इलेक्ट्रानिक वस्तुचा वापर केला तर ईव्हीएम हॅक झाले, असा आरोप होईल.

Rahul Gandhi, Rajiv Kumar
Yogi Adityanath : लोकसभेतील पराभवानंतर योगींची प्रतिष्ठा पुन्हा पणाला; अयोध्येत निवडणुकीची घोषणा

5 नंतर मतदान कसे वाढले?

सायंकाळी मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही आरोप झाले होते. राजीव कुमार यांनी सांगितले की, मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत असताना फॉर्म सी भरला जातो. जो अत्यंत महत्वाचा फॉर्म असतो. संपूर्ण फॉर्म हाताने लिहिला जातो. त्यानंतर प्रत्येक एजंटला तो फॉर्म दिला जातो. महाराष्ट्रात एक लाख बूथ होते. तिथेही चार लाखांहून अधिक फॉर्म बनवावे लागले होते. त्यानंतर पोलिंग अधिकारी तिथून जातात. त्यामुळे सातपर्यंत मतदान सुरू असताना लगेच टक्केवारी देणे अशक्य आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com