बंगळूर : कर्नाटकच्या (Karnataka) विधानसौधमध्ये (विधानसभा Assembly) अवैधरित्या पैसे घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडून दहा लाख ५० हजार रुपये जप्त केले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. (Attempt to take cash of ten and a half lakhs in the Legislative Assembly : One arrested)
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता विधानसौधच्या पश्चिम दरवाजातून अवैधरित्या पैसे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गेटवर तपासणी केली असता मंड्यातील या व्यक्तीच्या बॅगेत मोठी रक्कम असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या व्यक्तीला पैशाच्या स्त्रोताबाबत विचारणा केली असता त्याने कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक करून ती रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी या संदर्भात एफआयआर नोंदवला असून तपास सुरू आहे.
विधानसौधामध्ये सापडलेल्या पैशाच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. विधानसौध येथे एका व्यक्तीला पोलिसांनी पैशांसह अटक केली आहे. एका मंत्र्याच्या घरातून पोलिसांना दूरध्वनी आला. त्या व्यक्तीला पाठवले आहे. हा पैसा कोणाचा आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, याची सत्यता लोकांना कळायला हवी, असे ते म्हणाले.
दरम्यान, विधानसौध येथे पैसे सापडल्याप्रकरणी मंत्री सी. सी. पाटील यांनी राजीनामा द्यावा का, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘ते राजीनामा देत नाहीत. बी अहवाल लिहून सरकार प्रकरण बंद करून टाकतील. हे सरकार आणखी ६० दिवस राहणार आहे. राज्यातील प्रत्येकाने सरकारी भ्रष्टाचार अनुभवला आहे. कर्नाटकने देशातील सर्वात भ्रष्ट सरकार, असा लौकिक मिळवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.