Tanuja Bhoir : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून बड्या नेत्याची कन्या भाजपच्या वाटेवर ? ; 'या' फोटोमुळे चर्चांना उधाण

Nashik News : तनुजा भोईर यांचा भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांचे स्वागत करतांनाचा फोटो व्हायरल झाला आहे.
Tanuja Bhoir news update
Tanuja Bhoir news updatesarkarnama
Published on
Updated on

Nashik News : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) हे आजपासून (शुक्रवार) दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. राऊत नाशिकला येण्यापूर्वीच एका माजी मंत्र्याच्या कन्येचा फोटो व्हायरल झाला आहे. त्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा या फोटोमुळे सुरु झाली आहे. (Tanuja Bhoir news update)

देवळाली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथे गेली ३० वर्षे एकहाती प्रतिनिधीत्व केलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांची कन्या तनुजा भोईर (Tanuja Bhoir) यांचा भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांचे स्वागत करतांनाचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे चर्चांना उधाण आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेची गळती थांबवण्यासाठी संजय राऊत आज येत असतांनाच शिवसेनेमधील एका वजनदार नेत्यांच्या मुलीचा भाजप नेत्यांचे स्वागत करतांनाचा फोटो व्हायरल झाल्याने घोलप कुटुंबाची कोंडी झाली आहे.

या महिन्याअखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक मध्ये येत आहे. त्यांच्या दौऱ्याची तयारी सुरु असतानाच हा शिवसेनेचा हा मोठा झटका बसला असल्याचे बोलले जात आहे.

Tanuja Bhoir news update
NCP NEWS : भाजपचा भगवा हा भोगाचा प्रतिक झालाय ; जनजागर सभेत राष्ट्रवादीचा हल्लाबोल

एका पाठोपाठ पराभव

बबनराव घोलप यांची मोठी मुलगी माजी महापौर नयना वालझाडे-घोलप व तनुजा भोईर-घोलप यांचा मनपा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत घोलप पुत्र योगेश यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. एका पाठोपाठ झालेल्या पराभवाने घोलप कुटुंबाने थोडेही खचून न जाता मतदारसंघात युवकांची नवी मजबुत फळी तयार करुन पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.

Tanuja Bhoir news update
ZP Satara : शिक्षक भरतीत ६५ कोटींचा घोटाळा ; ७० शिक्षकांना चुकीची मान्यता ; आमदार शिंदेंचा गौप्यस्फोट

कौटुंबिक नाराजीची चर्चा

गेल्या दोन अडीच वर्षांपासून तनुजा भोईर या जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी म्हणून संपुर्ण देवळाली मतदार संघात विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून दौरे करीत आहेत.

माजी आमदार योगेश घोलप हे कंबर कसून जनतेच्या संपर्कात असतांना मुलगा योगेश व मुलगी तनुजा दोघेही मतदार संघात जनसंपर्क ठेवून आहेत, तनुजा भोईर यांच्या समर्थकांकडून सोशल मिडियावरील थेट विधानसभा निवडणुकीच्या पोस्ट टाकल्या जात असल्याने जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याच्या कारणावरुन कौटुंबिक नाराजीची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com