MVA In Patna Opposition Meeting: भाजपविरोधी बैठकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक प्रतिनिधी उपस्थित; तीन-तीन जणांना प्राधान्य

MVA In Patna Opposition Meeting: याच पाटण्यातून जयप्रकाश नारायण यांनी विरोधी ऐक्याची साद घातली होती.
Patna opposition meeting
Patna opposition meetingSarkarnama
Published on
Updated on

Bihar Politics: पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पुढाकाराने आयोजित होणाऱ्या भाजपविरोधी बैठकीत महाराष्ट्रातील सहा महत्वाचे नेते सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. शिवसेना उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून स्वत:उध्दव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत असे तिघेजण सहभागी झाले आहेत.

प्रत्येक पक्षातर्फे एकच प्रतिनिधी पाठवण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र कॉंग्रेसतर्फे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र हे अत्यंत महत्वाचे राज्य असल्याने येथील दोन्ही महत्वाच्या पक्षांचे तीन प्रतिनिधी हजर रहाण्यास नितीशकुमार (CM Nitish Kumar) यांनी होकार दिला आहे.४८ खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्राचे राजकीय महत्व मोठे गणले जाते.

Patna opposition meeting
Patna opposition meeting : …तर मोदींना ‘झोला’ खांद्यास लटकवून जावेच लागेल ; विरोधी पक्षाच्या बैठकीवरून ठाकरे गटाचं टीकास्त्र

भाजप (BJP) राजवटीतील निर्मम धोरणे, धृवीकरणाकडे झालेली वाटचाल,विरोधी पक्षांवर वरवंटा फिरवण्याची पध्दत या विरोधात रणनीतीवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्रातील नेत्यांची व्यवस्था घरचे पाहुणे असल्याने मुंबईत निवास असलेल्या बिहार विधानपरिषदेचे अध्यक्ष देवेश ठाकूर यांनी उचलली आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील हेही पाटणाहून मुंबईला रवाना झाला.उद्या सकाळी ११ वा बैठकीला प्रारंभ होईल.

या बैठकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, भाजपेतर पक्षांच्या या ऐक्याची बैठक ही उत्तम सुरुवात आहे.भाजपच्या जुलमी राजवटीला विरोध करण्यासाठी महत्वाचे पक्ष एकत्र येत आहेत.या ऐक्याबद्दल बोलताना भारताचे नागरिकही आशावादी आहेत किंबहुना पर्यायाकडे डोळे लावून बसले आहेत.याच पाटण्यातून जयप्रकाश नारायण यांनी विरोधी ऐक्याची साद घातली होती.पुढे जे झाले तो इतिहास आहे.त्या वेळी कार्यकर्ता असलेले नितीशकुमार आज मुख्यमंत्री झाले आहेत अन या ऐक्याचे यजमान. हा उत्तम प्रारंभ आहे."

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com