IAS Avi Prasad Marriage: सतत चर्चेत असलेले IAS अधिकारी अवी प्रसाद हे तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढले आहेत. त्यांनी IAS असलेल्या अंकिता धाकरे यांच्याशी तिसरा विवाह केला. त्यांची पहिली पत्नी रिजू बाफना या शाजापूरच्या कलेक्टर आहेत तर, दुसरी पत्नी डिप्टी सेक्रेटरी मिशा सिंह रतलाम या देखील कलेक्टर आहेत.
अवी प्रसाद हे मध्य प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांची तिसरी पत्नी अंकिता या राज्य मंत्रालयाता उपसचिव म्हणून कार्यरत आहेत.
अवी प्रसाद 2013 ला युपीएससीची परीक्षा दिली होती. तेव्हा ते IPS झाले होते. मात्र, पुन्हा 2014 ला परीक्षा देत ते IAS झाले. तेव्हा त्यांची 13 वी रँक आली होती. ते मुळचे उत्तर प्रदेशमधील सीतापूर तालुक्यातील आहेत.
अवी प्रसाद हे युपीएससीची तयारी करत असताना त्यांची ओळख रिजु बाफना यांच्यासोबत झाली होती. दोघांनी युपीएससीची तयारी एकत्र केली. त्यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यांनी काही वर्षापूर्वी घटस्फोट घेतला. रिजु बाफना या सध्या मध्य प्रदेशमधील शाजापुर जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत.
पहिल्या घटस्फोटानंतर अवि प्रसाद यांनी दुसरे लग्न आंध्र प्रदेशमधील 2016 बॅचच्या IAS मिशा सिंह यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर मिशा सिंह या मध्य प्रदेश केडरमध्ये आल्या. सध्या त्या रतलाम जिल्हाच्या कलेक्टर आहेत. दरम्यान, अवी प्रसाद आणि मिशा सिंह यांचे नाते देखील फार काळ टिकले नाही. चार वर्षापूर्वी त्यांनी घटस्फोट घेतला.
अवि प्रसाद 2017 बॅचच्या IAS अधिकारी अंकिता धाकरे यांच्यासोबत आता विवाह बंधनात अडकले आहेत. अंकिता धाकरे या राज्य मंत्रालयमध्ये उपसचिव म्हणून कार्यरत आहेत, 11 फेब्रुवारीला अवी प्रसाद आणि अंकिता हे लग्न बंधनात अडकले आहेत.
अवी प्रसाद यांचे कुटुंब राजकारणाशी संबंधित आहे. त्यांचे अजोबा टम्बेश्वर प्रसाद उर्फ बच्चा बाबू चौधरी हे चरण सिंह यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. अवी प्रसाद हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रशासनात परिचित आहेत.
सध्या ते मध्य प्रदेशच्या रोजगार गॅरंटी परिषदेचे मुख्य अधिकारी (सीईओ) आहेत. या पूर्वी त्यांनी अनेक जिल्हा परिषदांचे सीईओ आणि कलेक्टर म्हणून काम केले आहे. कटनी जिल्ह्याचे कलेक्टर असताना कुपोषणा विरोधात त्यांनी चालवलेल्या कुपोषण अभियान राज्यभर प्रसिद्ध झाले होते.