Ayodhya Ram Temple Donations: अयोध्येत राम मंदिरातील दानाबाबत मोठी माहिती समोर! भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदी पाठवले जायचे हैदराबादला, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क..!

Ayodhya Ram Temple donation investigation latest update : अयोध्येतील राम मंदिरातील भाविकांनी अर्पण केलेले सोने आणि चांदी हैदराबादला पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामागचे कारण काय होते, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
Ram Temple devotees donations
Ram Temple devotees donationsSarkarnama
Published on
Updated on

Ayodhya temple donation process: अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच या संपूर्ण प्रकरणात नवे खुलासे समोर येत आहेत. या मुद्द्यावर देशभरात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून विविध स्तरांवर चर्चा रंगली आहे.

काहीजण मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा दावा करत आहेत, तर काहींनी मंदिर प्रशासन आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, या सर्व प्रकरणाचे खरे चित्र तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, मंदिरात भक्तांकडून दान म्हणून मिळालेल्या चांदीच्या वस्तूंविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राम मंदिरात अनेक भाविक विविध प्रकारच्या चांदीच्या वस्तू अर्पण करत होते.

या वस्तूंची संख्या वाढत गेल्याने त्यांचे व्यवस्थापन आणि सुरक्षित साठवणूक करणे कठीण होत होते. त्यामुळे मंदिर प्रशासनाने या चांदीच्या वस्तू वितळवून त्यांचे चांदीच्या विटांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता.

Ram Temple devotees donations
Top 10 News : सुनेत्रा पवारांना धक्का, मोठ्या नेत्याचा राजीनामा ; पुणे महापालिकेतील 10 नगरसेवक अपात्र ठरणार? वाचा महत्त्वाच्या टॉप घडामोडी!

यासाठी सुमारे 1000 किलोग्राम चांदी हैदराबादला पाठवण्यात आली होती. हैदराबादमधील सरकारी सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेकडे चांदी वितळवण्याचे आणि त्याचे विटांमध्ये रूपांतर करण्याचे काम करण्यात येत होते. त्यामुळे अयोध्येत दान झालेली चांदी थेट हैदराबादला का पाठवली जात होती, याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची काही प्रमाणात उत्तरे मिळाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदीच्या वस्तू हैदराबादला पाठवणे, त्यांची तपासणी करणे, शुद्धता पडताळणे आणि त्यांचे विटांमध्ये रूपांतर करून पुन्हा परत आणणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च होत होता. वाहतूक खर्चासोबतच तांत्रिक प्रक्रियांसाठीही मोठी रक्कम खर्च करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

Ram Temple devotees donations
Mumbai Pune Train Cancelled : आधी एक्स्प्रेस वे, आता रेल्वेही कोलमडली! मुंबई-पुणे संपर्क तुटला; लोकलसह 16 गाड्या रद्द

दरम्यान, मंदिरातील दान व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि जबाबदार करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. विशेषतः दागिने आणि मौल्यवान वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र आणि उत्तरदायी व्यवस्था उभारण्याचे प्रस्ताव यापूर्वीही मांडण्यात आले होते. आता ट्रस्टच्या आगामी बैठकीत हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com