RSS Tiranga DP: विरोधकांच्या टीकेनंतर मोहन भागवतांच्या डीपीवर फडकला तिरंगा

RSS Tiranga DP : कॉंग्रेसचे नेते पवन खेडा यांनी मोहन भागवत यांच्या प्रोफाइलचा स्क्रीनशॉट को शेयर करुन त्यांच्यावर टीका केली होती. 'संघ वालों, अब तो तिरंगा अपना लो,'अशी टीका त्यांनी केली होती.
RSS Tiranga DP
RSS Tiranga DPsarkarnama
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Azadi Ka Amrit Mahotsav 2022) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार (PM Modi) स्वातंत्र्यदिनाच्या (Independence day 2022) दोन दिवस अगोदर आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या प्रोफाईलवर तिरंगा (Tiranga) ठेवला आहे. विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आपला डीपी बदलला असल्याची चर्चा आहे. (Har Ghar Tiranga Campaign)

नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) काही दिवसापूर्वी 'मन की बात' मधून देशातील जनतेला आपल्या सर्व सोशल मीडियाच्या डीपीवर (DP)वर तिंरगा ठेवावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार बहुसंख्य नेते, कोट्यावधी नागरिकांच्या डीपीवर तिंरगा दिसत आहेत.

RSS Tiranga DP
Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, खातेवाटपाचे ‘बारसे’ कधी ; शिवसेनेचा टोला

मोदींने डीपीवर तिंरगा ठेवण्याचे आवाहन ३१ जुलै रोजी केले होते, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपला डीपी बदलला नव्हता. त्यानंतर विरोधकांना या मुद्यांवरुन आरएसएसवर टीका केली होती. पण आता आरएसएसने आपल्या डीपीवर तिरंगा ठेवला आहे.

आता मोहन भागवत आणि संघाच्या टि्वटरच्या डीपीवर तिरंगा फडकला आहे. त्यामुळे भाजपवर टीका करण्याची एक संधी विरोधकांनी गमावली असल्याची खोचक टीका सोशल मीडियालवर सुरु आहे.

मोदींच्या आवाहननंतरही आरएसएसने डीपी न बदलल्यामुळे कॉंग्रेसचे नेते पवन खेडा यांनी मोहन भागवत यांच्या प्रोफाइलचा स्क्रीनशॉट को शेयर करुन त्यांच्यावर टीका केली होती. 'संघ वालों, अब तो तिरंगा अपना लो,'अशी टीका त्यांनी केली होती.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi)यांनी मोदी आणि मोहन भागवत यांच्यावर या मुद्यावरुन टीका केली होती. "भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर चालतो, तर मग आरएसएसने आपला डीपी का नाही बदलला, मोदी आम्हाला डीपी बदलायला सांगतात, संघाला डीपी बदलायला का सांगत नाहीत," असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com