पुणे : शिंदे-फडणवीस सरकारवर आजच्या 'सामना'मधून शिवसेनेनं टीकेचे बाण सोडले आहेत. 'सामना'च्या अग्रलेखातून शिंदे- फडणवीस सरकारमधील (eknath shinde) मंत्र्यांच्या खातेवाटपावरून (Maharashtra Cabinet) निशाणा साधला आहे. (Maharashtra Cabinet news update)
बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे, अशा शब्दात सामनातून शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पाळणा 40 दिवसांनंतर हलला खरा, पण आता त्याचे खातेवाटप लटकले आहे. मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन दिवस उलटले आहेत. देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन तोंडावर आला आहे; पण राज्याच्या मंत्रिमंडळाचे ना खातेवाटप झाले आहे ना जिल्हय़ा-जिल्हय़ांचे पालकमंत्री ठरले आहेत, असे अग्रलेखात म्हटलं आहे.
'आधी मंत्रिमंडळ विस्ताराला 40 दिवस लागले; आता त्यातील खातेवाटपासाठीही घोळात घोळ सुरू आहे. 40 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा पाळणा हलला तेव्हा या पाळण्याची दोरी नेमकी कोणाकडे आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. मात्र या पाळण्याला अनेक दोऱ्या आहेत आणि त्या आतल्या-बाहेरच्या अशा अनेकांच्या हातात आहेत असे दिसत आहे. जे पाळण्यात आहेत ते त्यांना हव्या असलेल्या खात्यांसाठी, तर ज्यांना पाळण्यात जागा मिळालेली नाही ते नाराजी व्यक्त करण्यासाठी हातातील दोरीचा ‘झटका’ देत आहेत,'असा टोला अग्रलेखात लगावला आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सामानातून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे.
तीन दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार बिनमंत्र्यांचे होते. 40 दिवसांनंतर कसाबसा मंत्रिमंडळाचा पाळणा हलला. दोन्हीकडच्या ‘नाकीनऊ’ अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्याला तीन दिवस उलटले तरी खातेवाटपाचे ‘बारसे’ होऊ शकलेले नाही. कारण हे सरकार ‘संधीसाधूं’चे आहे. ज्यांना मंत्रिमंडळात ‘संधी’ मिळाली ते ‘साधू’ बनल्याचे ढोंग करीत आहेत आणि मलईदार खात्यापासून हवा तसा बंगला मिळावा यासाठी रस्सीखेच करीत आहेत. त्यामुळे बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे, अशी टीका शिवसेननं सरकारवर केली आहे.
मुळात हे सरकारच अशा अनेक सुप्त ज्वालामुखींच्या तोंडावर बसले आहे. त्यापैकी कुठल्या ना कुठल्या सुप्त ज्वालामुखीचा उद्रेक, त्याचे हादरे, लाव्हारसाचे चटके या सरकारला अधूनमधून बसणारच आहेत. त्यातील पहिला हादरा सरकार समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी दिला. शिवाय ज्या मुद्दय़ांसाठी आपण शिंदे गटाला समर्थन दिले आहे ते बाजूला पडले तर वेगळा विचार करू, असे ‘गुद्दे’ही सरकारला लगावले. 3 दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार बिनमंत्र्यांचे होते. 40 दिवसांनंतर कसाबसा मंत्रिमंडळाचा पाळणा हलला. दोन्हीकडच्या ‘नाकीनऊ’ अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्याला तीन दिवस उलटले तरी खातेवाटपाचे ‘बारसे’ होऊ शकलेले नाही. कारण हे सरकार ‘संधीसाधूं’चे आहे. ज्यांना मंत्रिमंडळात ‘संधी’ मिळाली ते ‘साधू’ बनल्याचे ढोंग करीत आहेत आणि मलईदार खात्यापासून हवा तसा बंगला मिळावा यासाठी रस्सीखेच करीत आहेत. त्यामुळे बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे.
शब्द द्यायचा आणि नंतर फिरवायचा ही तर भाजपची रीतच आहे आणि त्याचा प्रत्यय 2019 मध्ये महाराष्ट्राला आलाच आहे. त्याआधीही 2014 मध्ये शेवटच्या क्षणी त्यांनी विश्वासघात केलाच होता.
शिंदे गटाने तरी दुसरे काय केले आहे? त्यांचा मुखवटा हिंदुत्व वगैरेचा असला तरी मूळ चेहरा विश्वासघात आणि धोकेबाजीचाच आहे. त्यामुळे या दोघांनी मिळून बनविलेले सरकार ‘धोका देणाऱ्यांचे’च आहे.
बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाचा पाळणा हलला असता तर त्यांना या ‘धोक्या’चा साक्षात्कार कदाचित झाला नसता; पण तसे झाले नाही आणि शिंदे-फडणवीस सरकारचे ‘कडू’ सत्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडले.
अनेक दुःखी आणि ‘सुप्त ज्वालामुखी’ शिंदे-फडणवीस सरकारात आहेत आणि त्यांचे कधी स्फोट होतील याचा काहीच भरवसा नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होऊनही अद्यापि खातेवाटप होऊ शकलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.