Sheikh Hasina: अमेरिका, ब्रिटनने नकार दिल्यावर 'लढाऊ बेगम’ शेख हसीना आता कुठे जाणार?

Bangladesh Crisis Sheikh Hasina Visa Revoked by America : शेख हसीना सध्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या एअरबेसवर आहेत. त्या युरोपीय देशात शरण घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांची बहीण रेहाना यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे.
 Sheikh Hasina
Sheikh HasinaSarkarnama
Published on
Updated on

US Revokes Sheikh Hasina’s Visa Amid Crisis : बांगलादेशात सरकारच्या विरोधात जनतेचे आंदोलन तीव्र झाल्याने पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडवा लागला, त्या सध्या भारतात आहेत. युरोपमध्ये शरण घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेख हसीना यांनी ब्रिटन सरकारने नकार दिला आहे.

तर दुसरीकडे अमेरिकेने त्यांचा व्हिसा नाकारला आहे, त्यामुळे 'लढाऊ बेगम’ म्हटल्या जाणाऱ्या शेख हसीना (Sheikh Hasina) यांना आता कुठे जाणार? याकडे जगाचे लक्ष लागले आहे. शेख हसीना सध्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या एअरबेसवर आहेत. त्या युरोपीय देशात शरण घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

त्यांची बहीण रेहाना यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे. त्यामुळे त्या ब्रिटनला जाणार असल्याचे समजते. पण ब्रिटनकडून अद्याप क्लीअरन्स आलेले नाही. लवकरच त्या भारत सोडणार असल्याचे समजते.

बांगलादेशाच्या लष्कराने सोमवारी शेख हसीना यांना देशाच्या बाहेर जाण्यासाठी व्यवस्था केली होती. सरकारी नोकरीतील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीवरून गेल्या महिन्यात सुरू झालेल्या उग्र आंदोलनाचा शेवट अखेर हसीना यांनी पंतप्रधानपद सोडून देशाबाहेर पलायन करण्यात झाला.

 Sheikh Hasina
Who is Nahid Islam: 26 वर्षीय विद्यार्थी नेत्यामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपद अन् देश सोडावा लागला

बांगलादेशातील सध्याच्या स्थिती अतिशय नाजूक आहे. त्याठिकाणी भारतविरोधी शक्ती सत्तेवर येऊ शकते. सत्ता बदल होताच बांगलादेशात हिंदुंना टार्गेट केलं जात आहे, हिंदुच्या मंदिरावर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत महत्त्वाच निवेदन दिल आहे.

"शेख हसीना यांनी भारतात काहीवेळ थांबू देण्याची विनंती केली” अशी माहिती एस. जयशंकर यांनी दिली.'भारत सरकार आर्मी चीफच्या संपर्कात आहे. आता तिथे जे सरकार सत्तेवर आहे ते आमच्या लोकांना सुरक्षा प्रदान करतील' असे एस. जयशंकर यांनी सांगितले.

शेख हसीना यांचा उल्लेख 'आयर्न लेडी' असा केला जातो. त्या पाच वेळा निवडून आलेल्या आणि चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी राहिलेल्या नेत्या होत्या, पण ज्या लष्करशासित बांगलादेशाविरुद्ध त्या लढल्या त्यांचीच प्रतिमा कालांतराने हुकूमशहा अशी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com