
Bangladesh News : पाकिस्तान आणि बांग्लादेशमधील संबंध तब्बल 15 वर्षांनंतर सुधारण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दोन्ही देशांमध्य चर्चा सुरू झाली असली तरी बांग्लादेशने पुन्हा जुन्या जखमेवरली खपली काढत पाकिस्तानावर अप्रत्यक्ष वार केला आहे. पाकिस्तानी परराष्ट्र सचिवांना बोलवून घेत बांग्लादेशने माफीनामा मागितला आहे.
बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये 15 वर्षांनंतर परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेदरम्यान बांग्लादेश मुक्तीलढ्याचा मुद्दा आला. 1971 मध्ये पाकिस्तानी सैन्याने त्यावेळी केलेला नरसंहार, महिलांवर केलेले बलात्कार यावर पाकिस्तानने माफी मागावी, अशी मागणीच बांग्लादेशने केली आहे. एवढेच नाही तर 4.5 अब्ज डॉलर भरपाईही मागितली आहे.
पाकिस्तानी सैन्याने 1991 मध्ये ऑपरेशन सर्चलाइट अंतर्गत लाखो बंगाली नागरिकांचा नरसंहार केला होता. लाखो महिलांना बलात्कार केला होता. बांग्लादेशकडून स्वतंत्र देशाची मागणी सुरू असताना हे घडलं होतं. स्वातंत्र्याचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पाकिस्तानने हे ऑपरेशन राबवले होते. असे मानले जाते की तब्बल 30 लाख नागरिकांची हत्या झाली होती. तर 10 लाख महिलांवर बलात्कार झाला होता. त्यावेळी अनेक नागरिक जीव वाचवण्यासाठी भारतात आले होते.
पाकिस्तानच्या नरसंहारानंतर भारताने त्यामध्ये उडी घेत बांग्लादेशला 16 डिसेंबर 1971 ला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारतीय लष्करासमोर पाकिस्तानी लष्कराने गुडघे टेकले होते. तेव्हापासून बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये 1971 च्या नरसंहारावरून माफीची मागणी केली जात आहे. पाकिस्ताने 1974 मध्ये बांग्लादेशला अधिकृत मान्यता दिली, पण नरसंहारावर कधीच माफी मागितली नाही. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत.
आता पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर बांग्लादेशने जखमेवरील खपली काढत पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. बांग्लादेशात सध्या अंतरिम सरकार आहे. सध्यातरी निवडणुका होतील, असे वाटत नाही. मात्र, पाकिस्तानाला पुन्हा गुडघ्यावर आणत नागरिकांमध्ये भावनिक करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाऊ शकतो. यापार्श्वभूमीर आता पाकिस्तान काय भूमिका घेणार, हेही महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.