Sheikh Hasina : शेख हसीना यांना ताब्यात द्या! बांग्लादेशच्या पत्राने भारत धर्मसंकटात, कोणते आहेत पर्याय?

Bangladesh India Sheikh Hasina Extradition : मागील काही महिन्यांपासून शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतलेला आहे.
Sheikh Hasina, Narendra Modi
Sheikh Hasina, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यामुळे भारत धर्मसंकटात सापडला आहे. बांग्लादेशने शेख हसीना यांच्या पत्यर्पणाची मागणी करणारे पत्र भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला लिहिले आहे. या हसीना यांना बांग्लादेशला सोपवण्याबाबतच्या अधिकृत मागणीमुळे आता भारताला याबाबत आपली भूमिका ठामपणे मांडावी लागणार आहे.

बांग्लादेशमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर शेख हसीना देश सोडून पळाल्या आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. त्या राजधानी दिल्लीत एका सुरक्षितस्थळी राहत असल्याचे सांगितले जाते. मागील काही महिन्यांपासून त्या भारतात आहेत. बांग्लादेशच्या गृह विभागाचे सल्लागार निवृत्त लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम चौधरी यांनी हसीना यांच्या प्रत्यपर्णाच्या मागणीबाबत माहिती दिली.

Sheikh Hasina, Narendra Modi
Amit Shah : अमित शहांच्या विधानाचे ‘NDA’तही पडसाद; मित्रपक्षाने सर्व प्रवक्त्यांना दाखवला घरचा रस्ता

शेख हसीना यांना भारताने बांग्लादेशला सोपवण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिले आहे, असे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू आहे. त्या बांग्लादेशात कधी परतणार, याबाबत निश्चिती नाही. भारत आणि बांग्लादेशामध्ये प्रत्यर्पण करार आहे, त्यानुसारच त्यांना परत आणले जाईल, असेही चौधरी यांनी सांगितले.

भारताकडे कोणते पर्याय?

शेख हसीना आणि भारताचे त्यांच्या कार्यकाळा चांगले संबंध होते. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून त्या भारतात आहेत. पण आता बांग्लादेशच्या मागणीमुळे भारताला ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासाठी भारतापुढे काही पर्याय आहेत. प्रत्यर्पण करारामध्ये काही अटी आहेत, ज्याआधारे भारत नकार देऊ शकतो. आरोप राजकीय स्वरुपाचे असतील, तर भारत बांग्लादेशची मागणी फेटाळू शकतो.

Sheikh Hasina, Narendra Modi
Narendra Modi : दीड वर्षात 10 लाख सरकारी नोकऱ्या! पंतप्रधान मोदींचा मोठा दावा...

शेख हसीना यांच्यावर बांग्लादेशात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या बांग्लादेशात परतल्यास त्यांना शिक्षा होणार, हे निश्चित. त्यामुळे भारताशी चांगले संबंध असलेल्या शेख हसीना यांना भारत बांग्लादेशात शिक्षा भोगण्यासाठी पाठवणार नाही, असे मानले जात आहे. त्यामुळे बांग्लादेशकडून त्यांच्यासोबत चांगल्या वर्तवणुकीबाबत भारताकडून विचारणा केली जाऊ शकते, असाही पर्याय आहे. पण त्याची हमी कोण देणार, हाही प्रश्नच आहे.

भारताकडून हसीना यांना एखाद्या अशा देशांमध्ये जाण्यास सांगितले जाऊ शकते, ज्या देशाचा बांग्लादेशसोबत प्रत्यर्पण करार नाही. असे झाल्यास भारताची धर्मसंकटातून सुटका होऊ शकते. त्यामुळे आता भारत काय भूमिका घेणार, याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com