Namaz Bengaluru Airport: विमानतळावर नमाज पठण; व्हिडिओ व्हायरल होताच...

BJP targets Karnataka govt after airport namaz video goes viral: बंगळूर इथल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही मुस्लिमांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Namaz At Bengaluru Airport Triggers Row; Watch Viral Video Here
Namaz At Bengaluru Airport Triggers Row; Watch Viral Video HereSarkarnama
Published on
Updated on

Namaz Video BJP Reaction: बंगळूर इथल्या देवनहळ्ळीजवळील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 मध्ये काही मुस्लिमांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विमानतळ परिसरातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत असून नेटिझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. भाजपने यावर कर्नाटकमधील काँग्रेस सरकार आगपाखड करत, स्पष्टीकरण मागितले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रॅलीचा दाखला देत, काँग्रेस सरकारला सुनावलं आहे.

माहितीनुसार, हे मुस्लिम (Muslim) प्रवासी मक्काला जाणाऱ्या यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी विमानतळावर आले होते. यावेळी त्यांनी अचानक सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा केली. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

विमानतळातील सुरक्षा यंत्रणा व कर्मचाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विमानतळाच्या आत प्रार्थना कक्ष उपलब्ध असतानाही प्रवाशांनी बाहेर नमाज का अदा केली, असा प्रश्न सोशल मीडियावर (Social Media) उपस्थित केला जात आहे.

Namaz At Bengaluru Airport Triggers Row; Watch Viral Video Here
BJP political strategy : राष्ट्रवादीच्या वाट्याला जास्त मुस्लिम मतदारसंघ; भाजपचा कुटील डाव झिरवळांनी सांगितला

या घटनेवर राज्य भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. पक्षाचे प्रवक्ते विजय प्रसाद यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री प्रियांक खर्गे यांच्याकडून याबाबत तातडीचे स्पष्टीकरण मागितले आहे. उच्च सुरक्षा क्षेत्रात अशा कृत्याला परवानगी कोणी दिली? संबंधित अधिकाऱ्यांकडून पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Namaz At Bengaluru Airport Triggers Row; Watch Viral Video Here
Amit Shah On Delhi Blast: दिल्ली पुन्हा टार्गेट..? गृहमंत्री अमित शाह यांची कार स्फोटानंतर पहिली मोठी रिअ‍ॅक्शन समोर, म्हणाले...

विजय प्रसाद यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) संबंधित अधिकाऱ्यांकडून रितसर परवानगी घेऊन रॅली काढली, तर सरकार आक्षेप घेते. मग प्रतिबंधित सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणासारख्या उपक्रमांकडे सरकार का दुर्लक्ष करते? अशा संवेदनशील ठिकाणी यामुळे गंभीर सुरक्षा चिंता निर्माण होत नाही का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com