BJP political strategy : राष्ट्रवादीच्या वाट्याला जास्त मुस्लिम मतदारसंघ; भाजपचा कुटील डाव झिरवळांनी सांगितला

NCP Interviews Candidates in Ahilyanagar Narhari Zirwal on BJP Strategy : मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थित अहिल्यानगर इथं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
Narhari Zirwal Ahilyanagar
Narhari Zirwal AhilyanagarSarkarnama
Published on
Updated on

Narhari Zirwal Ahilyanagar : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवळ यांनी मित्रपक्ष भाजपच्या राजकीय कुटील डावपेचावर भाष्य केलं.

'मुस्लिम मतदार भाजपला मतं देत नाहीत. त्यामुळे मुस्लिम बहुल भागातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्या जातात. पण आता हे चालणार नाही. आम्हाला देखील सन्मानजनकच जागा हव्या आहेत,' असे नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट सांगितले. नरहरी झिरवळ यांचे मुस्लिम मतदारांबाबत भाजपशी थेट निगडीत विधान आल्याने, महायुतीत मित्रपक्षांची धुसफूस जोरात सुरू असल्याच्या चर्चांनी वातावरण तापलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थित अहिल्यानगरमधील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती (Mahayuti) सत्ताधाऱ्यांची भूमिका मांडली. मुस्लिम मतदारांवर भाष्य करताना, त्यांनी भाजपच्या कुटील राजकीय डावपेचवर थेट भाष्य केल्याने, चर्चेचा विषय ठरला. मंत्री झिरवळ यांच्यावर अहिल्यानगरचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी आहे.

नरहरी झिरवळ म्हणाले, "मुस्लिम (Muslim) बहुल भागात भाजपला मतदान होत नाही, म्हणून ती जागा राष्ट्रवादी सोडणार, आता असे चालणार नाही. सन्मानजनकच जागा मिळाल्या पाहिजे. महायुतीची अजून चर्चा सुरू आहे. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी संयम ठेवून सर्वच जागावर तयारी सुरू ठेवावी."

Narhari Zirwal Ahilyanagar
Bihar Assembly election : बिहार निवडणुकीतील उड्डाणं; कोणत्या पक्षाची झाली सर्वाधिक हवाई सफर...

फजिती करून घेऊ नका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्ते, पदाधिकारी यांची इच्छुकांची संख्या मोठी आहे. अनेक जण इतरत्र देखील चाचपणी करत आहेत. त्यावर बोलताना झिरवळ म्हणाले, 'ते पक्ष सोडून गेले, ते पुन्हा निवडून येत नसतात. ज्यांना संधी मिळणार नाही त्यांनी पक्षाचे निष्ठा बाळगावी. कुठे ना कुठे संधी मिळेल. पण पक्ष सोडून गेलेल्यांची फजिती होईल.'

Narhari Zirwal Ahilyanagar
Nilesh Ghaywal: नीलेश घायवळच्या मुसक्या आवळण्यासाठी आता ई़डीची एन्ट्री

तरच महायुतीचा निर्णय घ्यावा

आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीला राज्यात चांगले वातावरण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिकेत दमदार कामगिरी करेल. कार्यकर्त्यांनी तयारीची पक्ष नेतृत्वाने दखल घ्यावी. यानंतर महायुतीचा निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

समितीच्या प्रमुखपदी संग्राम जगताप

या निवडणुकांसाठी पक्षाने 13 प्रमुख जणांची कृती समिती केली असून या कृती समितीचे नेतृत्व आमदार संग्राम जगताप करणार आहे. त्याचबरोबर आमदार काशिनाथ दाते, आमदार शिवाजीराव गर्जे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी या समितीत आहेत. अहिल्यानगरमधील मुलाखतींचा अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com