Telangana Political News: पक्षाने तिकीट नाकारले; माजी उपमुख्यमंत्री रडायलाच लागले

Thatikonda Rajaiah News : तेलंगणामध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका आहेत.
Thatikonda Rajaiah News
Thatikonda Rajaiah NewsSarkarnama

K. Chandrasekhar Rao News : तेलंगणामध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका आहेत. तेलंगणामध्ये सध्या के. चंद्रशेखर राव याचे सरकार आहे. त्याचा पक्ष भारत राष्ट्र समीतीने तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी मोठी तयारी केली आहे. बीआरएस समोर या निवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजपचे (BJP) आव्हान असणार आहे. त्यामुळे आघाडी घेत बीआरएसने आपली पहिली उमेदवार यादीही जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करताना त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांनाही धक्का दिला आहे. त्यांनी माजी उपमुख्यमंत्र्यांनाच तिकीट नाकारले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर माजी उपमुख्यमंत्र्यांना रडू कोसळले.

तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागा आहेत. चंद्रशेखर राव यांनी ११५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उमेदवारांची यादी जाहीर करताना त्यांनी उपमुख्यमंत्री थातिकोंडा यांना तिकीट नाकारल्यानंतर ते कार्यकर्त्यांसमोरच रडू लागले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बीआरएसने ११५ उमेदवारांची नावे जाहीर केली. स्वत: के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) गजवेल आणि कामारेड्डी या दोन जागांवरून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी त्यांनी तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि घानपूर (स्टेशन) मतदारसंघाचे विद्यमान आमदार थातिकोंडा राजैया यांना उमेदवारी नाकारली. त्यांच्या जागी जेष्ठ नेते कडियाम श्रीहरी यांना उमेदवारी दिली. घानापूर मतदारसंघातून भारत राष्ट्र समितीने त्यांना तिकीट नाकारल्यानंतर थातिकोंडा चांगलेच भावूक झाले. कार्यकर्त्यांसमोरच ते ढसाढसा रडू लागले.

Thatikonda Rajaiah News
Nagpur Congress News : ‘भारत जोडो’त जे झाले नाही, ते आता नागपुरात घडले; दिग्गज कॉंग्रेस नेत्यांचे हातात हात !

उमेदवारी नाकारल्यानंतर थातिकोंडा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी 'जय राजैया, जय तेलंगणा' अशी घोषणाबाजी केली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी थातिकोंडा राजैया यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या एका सरपंचाने लैंगिक छळाचा आरोप केला होता. याच कारणामुळेच त्यांना उमेदवारी नाकारल्याचे बोलले जात आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com