Lal Krishna Advani : मोठी बातमी ! लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर

Lal Krishna Advani Bharat Ratna : पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदन केले आहे.
Lal Krishna Advani
Lal Krishna Advani Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. मोदी सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदन केले आहे. (Lal Krishna Advani to get Bharat Ratna)

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर आता भाजपमधील दुसरे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. भाजपच्या जडण- घडणीत लालकृष्ण अडवाणी यांचं मोलाचं योगदान आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लालकृष्ण अडवाणी यांना शनिवारी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. यानंतर राजकीय नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. पंतप्रधान मोदींनीही ट्विट करत हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये काय म्हटलं ?

"मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक, भारताच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. अगदी तळागाळात काम करण्यापासून ते देशसेवा करण्यापर्यंतचे त्यांचे जीवन आहे. त्यांची संसदीय कारकीर्द कायमच समृद्ध करणारी ठरली, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Lal Krishna Advani
Ganpat Gaikwad Firing : गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; आमदार गायकवाडांना थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com