Karpuri Thakur : मरणोपरांत भारतरत्न मिळणारे कर्पूरी ठाकूर कोण ?

Bharat Ratna to Karpoori Thakur: भाजपाचा ओबीसींवर डोळा, नितीश कुमार टार्गेट
Karpuri Thakur
Karpuri ThakurSarkarnama
Published on
Updated on

Karpuri Thakur : ईबीसी आणि ओबीसी आरक्षणाचे प्रणेते आणि बिहारचे दोनदा मुख्यमंत्री असलेले समाजवादी दिग्गज नेते कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त मरणोपरांत भारतरत्न घोषित करण्यात आले आहे. केंद्रातील भाजपा सरकारने देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देत जनता दलाचे नितीश कुमार यांना टार्गेट करत बिहार तसेच ओबीसी यांना खुश करण्याचा मोठा राजकीय डाव यातून साधला आहे. भाजपा ओबीसींवर फोकस करुन हे सर्व करत असल्याचे चित्र भारतरत्न घोषित करताना दिसून येत आहे. इतकेच नाही तर लोकसभा निवडणूकीपूर्वी त्याच दृष्टीने मोठे प्रयत्न सुरु झाले आहे.

केंद्रातील भाजपा सरकारने भारतरत्न देताना देखील ईबीसी आणि ओबीसी आरक्षणाचे प्रणेते कर्पूरी ठाकूर यांना हा सर्वोच्च सन्मान देत बिहार आणि उत्तरप्रदेशातील ओबीसींना टार्गेट केले आहे. याचा मोठा परिणाम लोकसभा निवडणुकीत होण्याची शक्यता वाढली आहे. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 24 जानेवारी रोजी पाटणा येथे नितीश कुमार यांनी मोठी रॅली आयोजित केली आहे. ती यशस्वी करण्यासाठी नितीश कुमार यांनी मोठा जोर लावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Karpuri Thakur
Jagan Mohan Reddy : जगनमोहन यांना मोठा धक्का; निवडणुकीआधी खासदारांचे राजीनामे सुरूच...

इतकेच नाही तर नितीश कुमार यांना प्रभावित करण्यासाठी भाजपा या भारतरत्नचा उपयोग करु शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नितीश कुमार यांनी 22 जानेवारी ते 24 जानेवारी या तीन दिवसांत बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर जन्मशताब्दी वर्षाचे विविध कार्यक्रम घेत आहे. अशा वेळी थेट मरणोपरांत भारतरत्न देत भाजपाने मोठी राजकीय चाल चालली आहे.

काँग्रेस प्रणित 'इंडिया' आघाडीचे निमंत्रक पद नाकारल्यानंतर नितीश कुमार यांच्याकडे सर्वांच्या नजरा होत्या. त्यात आज कर्पूरी ठाकूर यांना मरणोपरांत भारतरत्न देत भाजपाने नितीश कुमार यांना योग्य तो संदेश दिला आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षासाठी जनता दल युनायटेड जोरदार तयारीला लागले आहे. निवडणुकीत उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये कास्ट फॅक्टर महत्वाचा मुद्दा असेल.

पाटण्यात 24 जानेवारी जाहीर सभा या कर्पूरी ठाकूर जन्मशताब्दी निमित्त आयोजित सभेत बिहारचे सर्व आमदार आमंत्रित करण्यात आले आहे. असे असताना थेट मरणोपरांत भारतरत्न देत नितीश कुमार यांना धक्का देण्याचे त्याच बरोबर सोबत घेण्याच्या हालचाली भाजपाच्या सुरु तर नाहीत अशी शंका या निमित्त निर्माण झाली आहे. जनता दल युनायटेड चे राज्यसभा खासदार व कर्पूरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर हे दरवर्षी कर्पूरी ठाकूर यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. यंदा ही ते आयोजन करण्यात आले असून त्या दृष्टीने बिहार सरकार प्रयत्नशील आहे.

कोण आहेत कर्पूरी ठाकूर ?

समाजवादी नेते आणि बिहारचे दोनदा मुख्यमंत्री असलेले कर्पूरी ठाकूर यांना जननायक म्हणून ओळखले जाते. त्यांना ईबीसी आणि ओबीसी आरक्षणाचे प्रणेते देखील म्हटले जाते. 1978 मध्ये मुख्यमंत्री असताना भारतीय जनसंघाला विरोध करुन त्यांनी सर्वांना आरक्षण दिले होते.

मुंगेरीलाल कमिशन त्यांनी लागू करत त्यात आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला 12 टक्के, ओबीसींना 8 टक्के तर महिलांना 3 टक्के आरक्षण दिले होते. इतक्यावर कर्पूरी ठाकूर थांबले नाही त्यांनी आर्थिकदृष्ट्या मागास सर्वणांना देखील 3 टक्के आरक्षण दिले होते. त्यामुळे त्यांचा मोठा पगडा बिहारमध्ये आहे.

शिक्षण मंत्री असताना इंग्रजी काढून टाकले

बिहारमध्ये दहाव्या वर्गात मुले इंग्रजी विषयात नापास होत होते. कर्पूरी ठाकूर जेव्हा बिहारचे शिक्षण मंत्री होते, तेव्हा त्यांनी इंग्रजी हा विषय काढून टाकण्याचा आदेश दिला. इंग्रजी हा कंप्लसरी विषय न ठेवता तो ऐच्छिक विषय त्यांनी केला.

(Edited By : Ganesh Thombare)

Karpuri Thakur
Maratha Reservation : 'निवडणुका बघून मराठ्यांना थातूरमातूर आरक्षण देऊ नका' ; जयंत पाटलांचा इशारा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com