Chief Justice of India: सर्वोच्च न्याययालयाच्या न्यायाधीस संजीव खन्ना हे 13 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागेवर 52 सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी भूषण गवई यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे गवई यांची नियुक्ती 52 वे सरन्यायाधीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 14 मे रोजी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारतील. राष्ट्रपती त्यांना पदाची शपथ देतील.
भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 ला अमरावतीमध्ये झाला. त्यांचे वडील रामकृष्ण गवई हे खासदार, बिहारचे राज्यपाल देखील होते. भूषण गवई यांनी आपल्या वकीलीची सुरुवात बॅ.राजा भोसले यांच्याकडे केली. 2003 मध्ये भूषण गवई यांना मुंबई उच्चन्यायालयात अतिरिक्त सरन्यायाधीश पदोन्नती मिळाली होती. तर, 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांची न्यायाधीस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
भूषण गवई यांना सरन्यायाधीस म्हणून सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. ते सरन्यायाधीश म्हणून ते 14 मे रोजी पदभार स्वीकारतील तर 23 नोव्हेंबर हा त्यांच्या कामाचा शेवटचा दिवस असेल. 23 नोव्हेंबरला ते सेवानिवृत्त होतील. भूषण गवई यांना राजकीय वारसा देखील आहे. त्यांचे वडील रामकृष्ण गवई हे रिपब्लिकन पक्ष (गवई गट) संस्थापक आहेत. त्यांनी ते रा.सू.गवई उर्फ दादासाहेब गवई म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार म्हणून विजयी झाले होते. तसेच केरळ, सिक्कमी, बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने कलम 370 हटवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला. निकाल देणाऱ्या खंडपीठामध्ये भूषण गवई देखील होते. तसेच लोकसभा निवडणुकीच्या आधी इलेक्ट्रीकल बाँड योजना रद्द करण्याचा निकाल देण्यात आला त्या खंडपीठाचे देखील गवई भाग होते. नोटाबंदीला मान्यता देण्याचा निर्णय देखील गवई यांनी दिला होता. तसेच तमिळानाडूनतील वन्नर समाजाला आरक्षणासंदर्भात देखील गवई यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.