CR Kesavan Join BJP: काँग्रेसला पुन्हा मोठा झटका? राजगोपालाचारी यांचे पणतू सीआर केसवन यांचा भाजपमध्ये प्रवेश

CR Kesavan : सीआर केसवन यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला
CR Kesavan
CR KesavanSarkarnama
Published on
Updated on

BJP News : माजी काँग्रेस नेते आणि भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे पणतू सीआर केसवन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

दिल्लीमध्ये त्यांचा हा पक्षप्रवेश झाला आहे. सीआर केसवन यांनी महिनाभरापूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यानंतर ते पुढे काय भूमीका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

CR Kesavan
Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री शिंदे अयोध्या दौऱ्याने काय साधणार? 'ही' आहेत दौऱ्यामागची पाच कारणं..

नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के.ॲंटनी यांचे सुपुत्र अनिल ॲंटनी यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता सीआर केसवन यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

CR Kesavan
Ajit Pawar News : 'शरद पवार आमचे सर्वोच्च नेते, त्यांची भूमिका हीच..' ; अजित पवार स्पष्टच बोलले

दरम्यान, काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर सीआर केसवन म्हणाले की, ''पक्ष सोडल्यानंतर मी काँग्रेसवर काही बोलावे असे मला वाटत नाही. काँग्रेसमध्ये सुरू असलेले राजकारण मला पटले नाही. अशा स्थितीत पक्ष सोडणे योग्य होते, तेच मी आज केले''.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com