Gujarat Election Result 2022 : गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! जिग्नेश मेवाणी पिछाडीवर

Gujarat Election Result 2022 : त्यांच्या विरोधात लढणारे भाजपचे उमेदवार आघाडीवर
Jignesh Mevani
Jignesh MevaniSarkarnama
Published on
Updated on

Gujarat Election Result २०२२ : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) बहुमताच्या जवळ आहे. तर काँग्रेस सध्या २१ जागांवर आघाडीवर असून आप (AAP) १० जागांवर आघाडीवर आहे. मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे नेते जिग्नेश मेवाणी हे पिछाडीवर गेले आहेत. तर त्यांच्या विरोधात लढणारे भाजपचे उमेदवार मणिभाई वाघेला हे आघाडीवर आहेत. (Jignesh Mevani News)

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये वडगाम या मतदार संघातील लढत महत्वाची मानली जात आहे. काँग्रेसचे युवा नेते जिग्नेश मेवाणी हे १२०० मतांनी पिछाडीवर पडले आहेत. तर मेवाणी यांना सध्या ३६९०१ तर भाजपचे (BJP) मणिभाई वाघेला यांना मेवाणी यांच्या विरोधात ३८०९३ मते मिळाली आहेत. त्यामुळे जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांची धाकधूक वाढली आहे.

Jignesh Mevani
Himachal Pradesh Election: भाजपचे पाच बडे मंत्री हिमाचलमध्ये पराभवाच्या छायेत!

याबरोबरच आम आदमी पार्टीला (Aam Aadmi Party) देखील मोठा धक्का बसला आहे. 'आप'चे गुजरातमधील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदान गढवी यांचा दारुण पराभव झाला आहे. आपने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Election) पत्रकार इसुदान गढवी (Isudan Gadhvi) यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं.

Jignesh Mevani
Gujarat Election Result : गुजरातचा निकाल देशाला दिशा देणारा... शंभूराज देसाई

केजरीवालांनी गुजरातमध्ये पक्षाच्या मुख्यमंत्रिपदासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर ''आम्हाला १६ लाख ४८ हजारांहून अधिक सूचना मिळाल्या असून यापैकी सुमारे ७३ टक्के लोकांनी इसुदान गढवी यांचे नाव सुचवले आहे, असं केजरीवाल यांनी सांगितलं होतं. एवढंच नव्हे तर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी स्वत: प्रचार केला होता.

दरम्यान, मात्र तरी देखील गुजरातमध्ये 'आप'ला म्हणावं तसं यश मिळालं नाही. महत्वाचं म्हणजे इसुदान गढवी यांचा पराभव झाला असून त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच जिग्नेश मेवाणी हे पिछाडीवर गेल्याने काँग्रेसची आणि मेवाणी यांची धाकधूक वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com