Gujarat Election Result : गुजरातचा निकाल देशाला दिशा देणारा... शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : कोणी कितीही यात्रा काढल्या तरी लोक विकासाच्या मागे उभे राहतात, हे या निकालातून दिसून आले आहे.
Narendra Modi, Shambhuraj Desai
Narendra Modi, Shambhuraj Desaisarkarnama

सातारा : गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने १५० जागांचे बहुमत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली मिळाले आहे. हा निकाल देशाला दिशा देणार आहे. पंतप्रधान मोदींचे व्हिजन व विचारांवर जनतेने या निकालाच्या माध्यमातून शिक्का मोर्तब केलेले आहे, असा विश्वास साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांनी आज त्यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गुजरातच्या निकालावर भाष्य केले. ते म्हणाले, गुजरातचा निकाल देशाला २०२४ चा निवडणूकीसाठी दिशा देणार आहे.

देशातील जनतेला अपेक्षित विकास होत असेल व राज्य देशात पुढे जात असून देश जागतिक पातळीवर एक नंबरला जात आहे. त्यामुळे मोदींच्या विचारांच्या पाठीशी जनता उभी रााहिली आहे. कोणी कितीही यात्रा काढल्या तरी लोक विकासाच्या मागे उभे राहतात, हे या निकालातून दिसून आले आहे, अशी टीका त्यांनी राहूल गांधींच्या भारत भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवली.

Narendra Modi, Shambhuraj Desai
APP देशाचा आठवा राष्ट्रीय पक्ष ? ; गुजरात, हिमाचलच्या निकालापूर्वीच झळकला फलक

देसाई म्हणाले कितीही कुणी यात्रा काढल्या, कुणाच्या पाठीमागे राहायचं प्रयत्न केला, कुणाच्या हातात हात घालून चालला तरी काही फरक पडत नाही, हे आजच्या निकालानंतर स्पष्ट हाेईल असा टाेला देसाईंनी राहूल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष मारला.

Narendra Modi, Shambhuraj Desai
Gujarat Election 2022 : 'हीच' रणनीती भाजपला गुजरात निवडणुकीत पोहचविणार शंभरीपार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com