Jayant Patil on Ajit Pawar: अजित पवार यांच्यावर अन्याय झाला का?; जयंत पाटलांनी स्पष्ट सांगितलं...

NCP Working President: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Political News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नव्या जबाबदारीसह सुप्रिया सुळे यांच्याकडे पंजाब, हरियाणा महाराष्ट्राची जबाबदारी तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीनंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.

यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य करत "अजित पवार यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नसून त्यांच्याकडे महाराष्ट्रात विरोधीपक्षनेते म्हणून मोठी जबाबदारी आहे", असं सांगितंल. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Jayant Patil
Ajit Pawar News : सुप्रिया सुळे अन् प्रफुल्ल पटेलांच्या निवडीनंतर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

या निवडीच्या माध्यमातून आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून आम्ही सर्वजण त्यासाठी काम करणार असल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

जयंत पाटील म्हणाले, "शरद पवार यांनी आज वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. या जबाबदाऱ्या देऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना कामाला लावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी आता काम सुरू केलं आहे", असं ते म्हणाले.

Jayant Patil
Dhnanjay Munde On Next Cm News : पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, वर्धापनदिनी मुंडेंचा संकल्प..

"या निवडीमध्ये कुठेही परिवार वाद दिसून येत नाही. आम्ही सर्वजण एकमताने एकसंघ आहोत. शरद पवार यांनी केलेल्या निवडीमध्ये कुठेही शंकेला जागा नाही. मात्र, आमच्या पक्षाबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम सुरू आहे. पक्ष वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत असून अजित पवार यांच्याकडे सध्या महाराष्ट्र विधानसभेतील विरोधीपक्षनेते म्हणून मोठी जबाबदारी आहे. त्यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही", असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com