West Bengal News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या सुरक्षेबाबत मोठी त्रुटी राहिल्याची माहिती समोर येत आहे. बॅनर्जी यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या बाजूच्या गल्लीत घुसण्याचा प्रयत्न करण्याऱ्या एका व्यक्तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या आरोपीकडून एक चाकू ही जप्त करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री निवासत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ही व्यक्ती पोलिसांचे स्टीकर लावलेले वाहनातून प्रवास करत होता, अशी ही माहिती मिळत आहे. सध्या पोलिसांनी या आरोपील ताब्यात घेतले असून, याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
कोलकाता शहर पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. 'मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाजवळील घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका व्यक्तिला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तिचे नाव शेख नूर आलम असे आहे. या व्यक्तिची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडून एक चाकू आणि अनेक ओळखपत्रे जप्त करण्यात आली.
आयुक्त पुढे म्हणाले, "आरोपी पोलीस स्टिकर असलेल्या वाहनातून प्रवास करत होता. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस, एसटीएफ, विशेष तपास शाखा आरोपींची चौकशी करत आहे. तपासात जे काही माहिती प्राप्त होईल ती सांगितली जाईल."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.