सोमय्यांचे पश्चिम बंगाल कनेक्शन: राऊतांनी केलं उघड

Sanjay Raut| Kirit Somaiya| आमची प्रतिष्ठा नाही का? सारी प्रतिष्ठा सोमय्यांच्या खोलीवर नाचते का? याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल.
Sanjay Raut Exposed Kirit somaiya
Sanjay Raut Exposed Kirit somaiyasarkarnama
Published on
Updated on

Sanajy Raiut Exposed kirit somaiya

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या युवक प्रतिष्ठानमध्ये संशयास्पद देणग्या येत आहेत. ज्या कंपन्यांवर ईडी सीबीआय या तपास यंत्रणांचे छापे पडत आहेत. त्या कंपन्यांकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यात संशयास्पदरित्या पैसे ट्रान्सफर होत आहेत. पश्चिम बंगालच्या मेट्रो डेअरीवर ईडी सीबीआय चे छापेमारी केली. त्या मेट्रो डेअरीमधून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यावर लाखो रुपये ट्रान्सफर झाले आहेत, असा खुलासा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

ज्या कंपन्यावर ईडी सीबीआयचे छापे पडत आहेत त्या कंपन्यांकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यावर लाखो, कोटी रुपयांच्या देणग्या ट्रान्सफर करण्यात आल्या आहेत. अशा एकूण 172 कंपन्या आहेत.सोमय्या एक प्रकारे खंडणी उकळण्याचे काम करत आहेत. भ्रष्टाचारविरोधी मुखवटा घालून किरीट सोमय्या अशाच प्रकारे पैसे उकळत आहेत. तर हे लोक भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र कसा करतील? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तर अशा लोकांना पाठीशी घालून देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिष्ठा डागाळली असल्याचा टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut Exposed Kirit somaiya
ठरलं तर! दोन दिवसात संभाजीराजे छत्रपती पुढची राजकीय भूमिका स्पष्ट करणार

सोमय्यांनी आमच्या घरातील महिलांवर आणखी आरोप केले तर आम्ही गप्प बसणार का?आमची प्रतिष्ठा नाही का? सारी प्रतिष्ठा सोमय्यांच्या खोलीवर नाचते का? याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल, असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज सकाळी संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मेट्रो डेअरीची चौकशी सुरु आहे. मेट्रो डेअरीकडून किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यावर लाखो रुपयांची देणगी दिल्याचे असं ट्विट केलं आहे. ''पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरी प्रकरणाची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी केली जात आहे. त्याच मेट्रो डेअरीने किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो रूपयांची देणगी दिली आहे. क्रोनोलॉजी समजून घ्या, हिसाब तो देना पडेगा भाई ! असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com