CM Bhupesh Baghel Snake Incident: मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत साप घुसल्याने मोठा गोंधळ; नेमकं काय घडलं ?

Snake In Political Press Conference: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
CM Bhupesh Baghel
CM Bhupesh Baghel Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Chhattisgarh Politics: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. भर पत्रकार परिषदेत साप घुसल्याने मोठा गोंधळ उडाला. मुख्यमंत्री भूपेश बघेल हे बिलासपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. मात्र, तेथे अचानक साप त्यांच्या थेट पायापर्यंत आल्याने मोठा गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुख्यमंत्री भूपेश बघेल हे पत्रकारांशी संवाद साधत होते. पण इतक्यातच थेट मुख्यमंत्र्यांच्या पायापर्यंत साप आला. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, या सापाला मारू नका, सापाला सुरक्षित जाऊ द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यानंतर त्या सापाला सुरक्षित जाऊ देण्यात आले.

छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. याच अनुषंगाने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देखील जोरदार तयारी सुरू केली असून मेळावे, सभा यावर ते भर देत आहेत.

तर दुसरीकडे छत्तीसगडच्या निवडणुकीसाठी भाजपकडून देखील २१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या छत्तीसगडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. यातच सोमवारी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या पत्रकार परिषदेत साप घुसल्याने गोंधळ उडाला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com