Aditya Thackeray: शिवसेनेच्या १५ आमदारांना बंडखोरांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी त्यातून माझे नाव वगळले असल्याची चर्चा आहे. पण कुणाच्याही खास प्रेमाची गरज नाही, १४ शिवसैनिक निष्ठावंत आहेत मी त्यांच्यासोबतच आहे. शिवसेनेचाच व्हीप अधिकृत असून त्याचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई होणारच. शिवसेनेशी ज्यांनी गद्दारी केली त्यांनी राजीनामा द्यावे आणि निवडणुकीला सामोरे जावे, आम्ही आजही तयार आहोत, अशा शब्दांत शिवसेना (Shivsena) नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोरांना सुनावले. (Aditya Thackeray Latest Marathi News)
शिवसेना भवन येथील महिला जिल्हाधिकार्यांची बैठक संपल्यानंतर शिवसेना आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी साधला. ते म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मध्यावधी निवडणुका लागणार अशी शक्यता आहे. या मध्यावधी निवडणुका लागल्या तरी त्या जिंकण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असे अदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांचे भाषण आपण ऐकले का, असे माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकले नाही. पण शिवसैनिकांचा आवाज उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. तो त्यांचा आवाज ऐकतोय. शिवसेनेसोबत एकनिष्ठ असलेले आमदार आणि शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. गेली अडीच वर्षे कोणतीही टीका टिप्पणी केली नाही, नेहमी चांगल्या कामांवर बोललो. आताही चांगलेच बोलेऩ, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.