Arun Gandhi Death News : मोठी बातमी: महात्मा गांधी यांचे नातू आणि लेखक अरुण गांधी यांचं निधन

Arun Gandhi grandson of Mahatma Gandhi Passed Away : सेवाग्राम आश्रमात १९४६ च्या दरम्यान त्यांनी महात्मा गांधी यांच्यासोबत वास्तव्य केलं होतं.
Arun Gandhi Death News
Arun Gandhi Death News Sarkarnama

Kolhapur: महात्मा गांधी यांचे नातू व लेखक अरुण गांधी यांचं मंगळवारी(दि.२) अल्पशा आजारानं कोल्हापूर येथे निधन झालं आहे. त्यांनी ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गांधी यांच्या पार्थिवावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांचे पुत्र तुषार गांधी(Tushar Gandhi) यांनी दिली आहे.

अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र असून १४ एप्रिल १९३४ रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. गांधी यांनी माजी केंद्रीय मंत्री म्हणून देखील काम केलं होतं. ते महात्मा गांधी यांचे पणतू व ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांचे वडील होते. गांधी १९८७ मध्ये त्यांच्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले होते. तेथे त्यांनी विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली होती.मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ते कोल्हापूरमधील अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या घरी हणबरवाडी येथे वास्तव्याला होते.

Arun Gandhi Death News
Ajit Pawar News : अजितदादांनी राखलं कार्यकर्त्याचं मन; थेट आले अन् झेरॉक्सच्या दुकानात काढली प्रत

गांधी यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी 'द गिफ्ट ऑफ एंगर : अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी' हे त्यांचे प्रमुख पुस्तक आहे. गांधी यांचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठं योगदान होतं. महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालण्याचं काम त्यांनी केलं. ते पाच वर्षांचे असताना त्यांनी गांधी यांना पाहिलं होतं. सेवाग्राम आश्रमात १९४६ च्या दरम्यान त्यांनी महात्मा गांधी यांच्यासोबत वास्तव्य केलं होतं.

Arun Gandhi Death News
Kirit Somaiya News : जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरण; साळुंखेंना अटक,आता सोमय्यांची 'ही' नवीन मागणी

अरुण गांधी(Arun Gandhi) यांच्यावर पुत्र तुषार व त्यांचे नातेवाईक यांच्या संमतीनं वाशी (ता. करवीर, जि. कोल्हापूर, नंदवाळ रोड, येथील गांधी फौन्डेशनच्या जागेत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती ज्येष्ठ राजकीय पत्रकार राजकीय पत्रकार जतीन देसाई यांनी माहिती दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com