Ajit Pawar News : अजितदादांनी राखलं कार्यकर्त्याचं मन; थेट आले अन् झेरॉक्सच्या दुकानात काढली प्रत

NCP News : कार्यकर्त्याचा आग्रह अन् अजितदादांकडून तात्काळ इच्छा पूर्ण
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. अजित पवार हे नेहमी रोखठोक बोलतात. आक्रमक स्वभाव असलेल्या अजित पवारांचे बारामतीत एक वेगळे रूप पहायला मिळाले.

अजित पवार यांच्याकडे एका झेरॉक्स दुकान चालकाने एक इच्छा व्यक्त केली. त्यानंतर अजित पवारांनी कार्यक्रमात व्यस्त असूनही आवर्जून दहा मिनिटे वेळ काढत आपल्या जिवाभावाच्या कार्यकर्त्याची इच्छा पूर्ण केली.

Ajit Pawar
Pune Crime News: बापरे! सायबर चोरट्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना केलं टार्गेट; बनावट फेसबुक अकाउंट बनवत...

अजित पवार यांचा सोमवारी बारामती दौरा होता. या दौऱ्यादरम्यान विविध विकास कामांची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर अजित पवार हे महाराष्ट्र दिनी प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहणासाठी निघालेले असताना सुहास मढवी या कार्यकर्त्याने "माझ्या दुकानात मी सेकंडहँड झेरॉक्स मशीन घेतले आहे. त्याची झेरॉक्सची पहिली प्रत तुम्ही (अजित पवार यांनी) काढावी", अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली.

त्यावर लगेच अजित पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार देत आपला मोर्चा थेट दुकानाकडे वळविला. अजित पवार यांनी सुहास मढवी यांच्या छोट्याशा दुकानाचे उद्घाटन केले. यावेळी अजितदादांनी झेरॉक्स कशी काढतात? हे देखील शिकून घेतले. तसेच दुकानदाराला त्याच्या दुकानासाठी शुभेच्छा दिल्या.

Ajit Pawar
Narayan Rane Vs Thackeray : '' राणे ठाकरेंचं भांडण म्हणजे नवरा बायकोचं भांडण;त्यात...''; प्रकाश आंबेडकरांनी फटकारलं

आपल्या झेरॉक्स दुकानाचे उद्घाटन अजितदादांनी केल्यामुळे दुकान चालकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर याबात प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, "मी जर झेरॉक्स मशीनचे बटन दाबून दुकानदाराचे समाधान होत असेल तर कशाला त्याला नाराज करायचे? म्हणून झेरॉक्स दुकानाला भेट दिली".

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com