Karnataka Governemt : मोठी बातमी! सिध्दरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री,डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री...

Karnataka Government News : नवनिर्वाचित सरकारचा शपथविधीसोहळा शनिवारी (दि.20) बंगळुरू येथे होणार
Siddaramaiah, D K Shivkumar
Siddaramaiah, D K ShivkumarSarkarnama

Karnataka Government News :कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन तिढा निर्माण झाला होता. कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार या दोघांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होते. अखेर हा तिढा सोडविण्यात यश आलं असून कर्नाटकच्या मुख्यमंत्री सिध्दरामय्या तर उपमुख्यमंत्रीपदी डीके शिवकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. याबाबतची अधिकृत घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरुन पडद्यामागं अनेक राजकीय घडामोडी घडल्या. सिध्दरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु होती. दो्न्हीही नेते आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर ठाम होते.त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबत उत्सुकता होती. अखेर अखेर सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहे. अखेर काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या (Siddaramaiah) तर उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार यांच्या नावावर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ चर्चेनंतर कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी एकमत झालं. नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी सोहळा शनिवारी (दि.20) बंगळुरू येथे होणार आहे.

Siddaramaiah, D K Shivkumar
सिद्धरामय्यांनीच आम्हाला काँग्रेस सोडायला भाग पाडले : माजी मंत्री सुधाकर, सोमशेखर यांचा गौप्यस्फोट

सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री?

सिद्धारामय्या यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. ते काँग्रेसचे कर्नाटकमधील ज्येष्ठ नेते आहेत. उच्चशिक्षित असून त्यांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. सिद्धारामय्या हे धनगर समाजातील आहेत. कर्नाटका(Karnataka) त धनगर समाज मोठ्या प्रमाणावर असून या वर्गावर सिद्धारामय्या यांचा मोठा प्रभाव आहे. आताही त्यांनी कर्नाटकात काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच काँग्रेस हायकमांडनं त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी सिद्धारामय्या यांनी 2013 ते 2018 या कालावधीत कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं.

Siddaramaiah, D K Shivkumar
Siddaramaiah to be Karnataka CM : कर्नाटक CM वरील वादावर 'डीके' म्हणाले.. "मी पूर्णपणे आनंदी नाही.."

शेतकरी कुटंबात जन्म

म्हैसूर येथील एका शेतकरी कुटुंबात 3 ऑगस्ट 1947 रोजी सिद्धरामय्या यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सिद्धारमे गौडा हे शेती करत. त्यांची आई बोरम्मा या गृहिणी होत्या. सिद्धारामय्या यांना पाच भाऊ बहीण आहेत. ते भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकवर आहेत. तसेच हे स्टेट बोर्डाचे टॉपर होते. त्यांनी मैसूर विद्यापीठातून बीएससीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी एलएलबीची पदवीही मिळवली होती.

भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही...

सिद्धारामय्या यांनी आजपर्यंत 12 निवडणुका लढवल्या. त्यातील 9 निवडणुकांमध्ये त्यांना विजय मिळाला. त्यांनी 1994 मध्ये जनता दल सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. प्रशासनावर प्रंचड पकड असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. सिद्धारमैया हे जेडीएसमध्ये होते. 2008मध्ये त्यांना जेडीएसमधून काँग्रेसमध्ये आणण्यात मल्लिकार्जुन खर्गे यांचा मोठा वाटा होता. सिद्धारामय्या हे त्यांचे निकटवर्तीय मानले जातात.

Siddaramaiah, D K Shivkumar
Congress News : सिद्धरामय्यांनीच आम्हाला काँग्रेस सोडायला भाग पाडले : माजी मंत्री सुधाकर, सोमशेखर यांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्रीपदाचा तिढा निर्माण झाल्यानंतर दिल्लीत भेटीगाठींना उधाण आलं होतं. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी बुधवारी (दि.17 ) दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती.

त्यानंतर बुधवारी रात्री शिवकुमार(DK Shivakumar) यांनी रणदीप सुरजेवाला यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि सुरजेवाला यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. सिद्धरामय्या यांनीही रात्री वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी आणि सुरजेवाला यांच्याशी चर्चा केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com