INDIA Alliance Meeting : मोठी बातमी ! 'इंडिया आघाडी'त बिघाडी ? भोपाळमध्ये होणारी पहिली जाहीर सभा रद्द

INDIA Rally Cancelled : 'इंडिया आघाडी'त मिठाचा खडा ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
INDIA Alliance Meeting
INDIA Alliance MeetingSarkarnama

Delhi News: आगामी निवडणुकीत मोदी-शाहांना सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार तयारी सुरु केलेली असतानाच आता 'इंडिया आघाडी'त बिघाडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. भाजपच्या विरोधात भोपाळमध्ये 'इंडिया आघाडी'ची होणारी पहिली जाहीर सभा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपच्या विरोधात 'इंडिया आघाडी' भोपाळमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचे इंडिया आघाडी'च्या बैठकीत ठरले होते. मात्र, आता भोपाळमध्ये होणारी आघाडीची जाहीर सभा रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिली आहे.

INDIA Alliance Meeting
INDIA Alliance Meeting : 'इंडिया आघाडी'च्या बैठकीत मोठा निर्णय; भाजपविरोधात देशभरात जाहीर सभा घेण्यात येणार

विरोधी पक्षाच्या 'इंडिया आघाडी'च्या समन्वय समितीची दिल्लीत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी महत्वाची बैठक झाली होती. याच बैठकीत 'इंडिया आघाडी'च्या आगामी रणनीतीला अंतिम स्वरूप देत भाजपविरोधात देशभरात जाहीर सभा घेण्याचा निर्णय झाला होता.

तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये भाजपच्या विरोधात 'इंडिया आघाडी'सभा होणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते के. सी. वेणूगोपाल यांनी केली होती. मात्र, आता ही सभा रद्द झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. पण ही सभा का रद्द करण्यात आली, याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे 'इंडिया आघाडी'त सर्वकाही आलबेल आहे ना, याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

Edited by - Ganesh Thombare

INDIA Alliance Meeting
India Aghadi's Lok Sabha Strategy : इंडिया आघाडीचं ठरलं; जागावाटप राज्यपातळीवरच होणार, राष्ट्रीय नेते करणार शिक्कामोर्तब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com