India Aghadi's Lok Sabha Strategy : इंडिया आघाडीचं ठरलं; जागावाटप राज्यपातळीवरच होणार, राष्ट्रीय नेते करणार शिक्कामोर्तब

Loksabha Election : इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी महत्वाची बैठक झाली.
India Aghadi
India AghadiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पराभूत करण्याचा चंग इंडिया आघाडीने बांधला आहे. त्या दृष्टीने ‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडली. त्यात लोकसभा जागावाटपाची चर्चा राज्य स्तरावर करण्यात येणार असून राष्ट्रीय पातळीवर एक बैठक घेऊन त्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (Allotment of Lok Sabha seats of India Alliance will be done at the state level)

विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी महत्वाची बैठक झाली. या बैठकीत 'इंडिया आघाडी'ची आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरली आहे. लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्य स्तरावरील नेते ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार आहेत. त्यानंतर राज्य स्तरावर झालेल्या या जागा वाटपाला अंतिम रूप देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.

India Aghadi
MLA Disqualification Case : ठाकरे गटाच्या वकिलाने युक्तिवाद करताच शिंदे गटाने घेतला हा मोठा आक्षेप…

या बैठकीस काँग्रेस नेता के. सी. वेणुगोपाल, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, जनता दलाचे संजय झा, सीपीआयचे डी. राजा, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ता, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत, समाजवादी पार्टीचे जावेद आली, आपचे राघव चड्डा, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला उपस्थित होते.

'इंडिया आघाडी'ची पुढची सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये होणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित सभा घेण्यासंदर्भातही चर्चा झाली आहे. त्यासोबतच इंडिया आघाडीच्या जागा वाटपाची जबाबदारी आता राज्यस्तरावरील नेत्यावर असणार आहे.

India Aghadi
Manoj Jarange Andolan : ओरिजनल खानदानी मराठा आहे, ती औलाद माझी नाही; मनोज जरांगेंनी कुणाला सुनावले

सर्व राज्यातील नेत्यांनी आपल्या आपल्या राज्यातील जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्याचे ठरले आहे. त्यानुसार आता या महिन्याअखेरीपर्यंत जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्यात येईल, त्यानंतर राज्यस्तरावर झालेल्या या जागा वाटपाला अंतिम रूप देण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर एक मीटिंग आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये या सर्व जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.

India Aghadi
Manoj Jarange Statement: ...तर त्याच दिवशी मी आत्महत्या करेन; मनोज जरांगेंचे मुख्यमंत्र्यांसमोरच ओपन चॅलेंज

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com