Mohammed Faizal News: राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा! मोहम्मद फैजल यांना पुन्हा एकदा मिळाली खासदारकी...

Mohammad Faizal's Lok Sabha Membership Restored: लोकसभा सचिवालयानं खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात न्यायालयानं १० वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर ११ जानेवारी रोजी फैजल यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं.
Mohammed Faizal News
Mohammed Faizal NewsSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयावरून देशभरात मोठा वादंग निर्माण झाला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या सभागृहाचं सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आली आहे.

लोकसभा सचिवालयानं ११ जानेवारी रोजी फैजल यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. १३ जानेवारी रोजी त्याची अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, केरळ उच्च न्यायालयानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळं नियमानुसार त्यांचं सदस्यत्व पुन्हा बहाल करणं गरजेचं होतं. तसं न झाल्यानं फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच लोकसभा सचिवालयानं आपली चूक सुधारत त्यांना पुन्हा सदस्यत्व बहाल केलं आहे.

Mohammed Faizal News
Girish Bapat News: मोठी बातमी! खासदार गिरीश बापटांची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात उपचार सुरु

काय आहे प्रकरण?

२००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात मोहम्मद फैजल (Mohammed Faizal) आणि त्यांच्या समर्थकांनी दिवंगत केंद्रीय मंत्री पी. एम. सईद यांचे जावई मोहम्मत सालेह यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणी त्यांच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक न्यायालयानं फैसल यांच्यासह अन्य ३ जणांना १० वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी १ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती.

Mohammed Faizal News
Gandhi-Savarkar Politics: मोठी बातमी! राहुल गांधीकडून सावरकरांविषयी केलेले सर्व ट्विट डिलीट...?

सुनावणी आधीच निर्णय...

लोकसभा सचिवालयानं त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं होतं. केरळ उच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती देऊन दोन महिने उलटल्यानंतरही त्यांना पुन्हा सदस्यत्व बहाल करण्यात आलं नव्हतं. त्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. पुढील सुनावणी आज(दि.२९) होणार होती. त्याआधीच हा लोकसभा सचिवालयाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com