Gandhi-Savarkar Politics: मोठी बातमी! राहुल गांधीकडून सावरकरांविषयी केलेले सर्व ट्विट डिलीट...?

All tweets of Savarkar deleted by Rahul Gandhi | मी माफी मागणार नाही, मी सावरकर नाही गांधी आहे. असे विधान राहुल गांधींना केले होते
Gandhi-Savarkar Politics
Gandhi-Savarkar Politics Sarkarnama
Published on
Updated on

All tweets of Savarkar deleted by Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली. पण मंगळवारी अचानक राहुल गांधींनी सावकरांविषयीचे सर्व ट्विट्स डिलीट केल्याची चर्चा सोशल मिडीयावर होऊ लागली आहे. यामुळे राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशभरात चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभेत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. या कारवाईनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण माफी मागणार का असा सवाल विचारल असता त्यांनी, मी माफी मागणार नाही, मी सावरकर नाही गांधी आहे. असे विधान केले. या विधानाने भाजप-काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली. त्यानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. खेडच्या सभेत उद्धव ठाकरे यांनीही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असं सांगत राहुल गांधींना ठणकावून सांगितलं.

Gandhi-Savarkar Politics
Nitin Gadkari Threat Case: गडकरींना धमकीचे फोन; जयेश पुजारीचे धक्कादायक खुलासे

राहुल गांधींविषयीचा वाद वाढत चालल्याचं पाहून यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली आणि सावरकरांविषयी वारंवार वक्तव्य करणे आणि त्यांना माफीवीर म्हणणंही योग्य नाही. असा सल्ला दिला. तसेच या वादामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते अशी शक्यताही सांगितली. त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही दुजोरा देत त्यांचं म्हणणं मान्य केलं.

यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवार यांनी सावरकरांचा मुद्दा उपस्थित करत, सावरकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य नव्हते. महाराष्ट्रात सावरकरांचा खूप आदर केला जातो, परंतू त्यांच्यावर वारंवार टीका केल्यास महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं सांगितलं.

Gandhi-Savarkar Politics
Shinde Government : महिलेच्या मृत्यूनंतर शिंदे सरकारला खडबडून जाग; मुख्यमंत्री शिंदेंनी दिले 'हे' आदेश

तसेच, विरोधी पक्षांची खरी लढाई ही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आहे. सावरकरांविषयी अशी विधाने केल्यास महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. असं त्यांनी राहुल गांधी यांना उद्देशून सांगितलं. यानंतर राहुल गांधींनी त्यांचे सावरकरांविषयीचे सर्व ट्विट्स डिलीट केल्याची चर्चा सोशल मिडीयावर सुरु आहे.

काय आहे सत्य ?

तथापि, या गोष्टींची सत्यता पडताळण्यासाठी त्यांचे ट्विट्स पाहिले असता राहुल गांधींनी त्यांचे कोणतेही ट्विट हटवलेले नाही. गेल्या काही दिवसांत त्यांनी एकही ट्विट डिलीट केलेले नाही. अशा परिस्थितीत त्यांनी वीर सावरकरांवरील ट्विट हटवल्याची चर्चा खोटी आहे, ही अफवा असल्याचे दिसत आहे. राहुल गांधींच्या 'कॅश्ड ट्विट्स'मध्येही असे एकही ट्विट दिसत नाही जे हटवले गेले आहे. वीर सावरकरांबद्दल त्यांनी ट्विट केले नसावे अशीही शक्यता आहे, त्यामुळेच ते ट्विटरवर दिसत नाही, कारण त्यांनी बहुतेक पत्रकार परिषदा-रॅलींमध्ये अशी विधाने केली आहेत आणि हे सर्व पक्षाच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केले गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com