Imran Khan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा; तोशाखाना प्रकरणातील शिक्षेला स्थगिती

Pakistan Former PM Imran Khan: इम्रान खान यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला इस्लामाबाद हायकोर्टाने स्थगिती दिली.
Pakistan Former PM Imran Khan
Pakistan Former PM Imran KhanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pakistan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. तोशाखाना प्रकरणामध्ये इम्रान खान यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, इम्रान खान यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला इस्लामाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

इम्रान खान यांच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याच प्रकरणात इम्रान खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तोषाखाना प्रकरणात इम्रान यांना अटकही झाली होती. सत्र न्यायालयाने इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणामध्ये दोषी ठरवत तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

Pakistan Former PM Imran Khan
Jay Pawar In Politics : अजितदादांचे धाकटे चिरंजीवही उतरणार राजकारणाच्या आखाड्यात; जय पवारांचे स्पष्ट संकेत...

सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत इम्रान खान यांच्यावतीने इस्लामाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत सत्र न्यायालयाने सुनावलेल्या तीन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती त्यांनी हायकोर्टाला केली होती.

या तोशाखाना प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर इस्लामाबाद हायकोर्टाने इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांचा जामीन मंजूर केला. हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे इम्रान खान यांचा आता तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com