
Bihar News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा पुढे दिसत होती. मात्र, तिकीट वाटपानंतर काही ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात लढण्याचे दिसले. मैत्रीपूर्ण लढतीमुळे महाविकास आघाडीला फटका बसला. तसेच काहीसे चित्र बिहारमध्ये दिसून येत आहे. एनडीए विरुद्ध राष्ट्रीय जनता दल (राजद)- काँग्रेस यांचे महागठबंधन लढत आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत तब्बल 11 ठिकाणी महागठबंधनचे उमेदवार एकमेकांच्या विरधात लढणार आहेत.
सोमवार (आज) उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. मात्र, अजुनही उमेदवारी मागे घेण्याच्या दिसून येत नाहीत. त्यामुळे महागठबंधनमध्ये मैत्रीपूर्ण लढत काही ठिकाणी दिसून येईल.
सहा जागांवर काँग्रेस-राजद, तीन जागांवर सीपीआ-काँग्रेस, दोन जागांवर रासद-वीआईपी असा महागठबंधन मधील मित्रपक्षांमध्ये लढत होणार आहे. राजदचे प्रमुख तेजस्वी यादव हे माघार घेण्यास तयार नसून ज्या जागांवर त्यांनी उमेदवार दिले आहेत. त्यांना एबी फाॅर्म देखील देण्यात येत आहेत.
बिहार काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष राजेश राम यांच्या कुटुंबाच्या विरोधात राजदने सुरेश पासवान यांना उमेदवारी दिली आहे. राजेश राम म्हणाले की, तेजस्वी यादव गठबंधनच्या विरोधात काम करत आहेत. दलित नेत्यांना कमजोर करण्याचे काम करत आहेत. आरजेडीने दिनारा, डिहरी, सासाराम, नवीनगर, नोह, रफीगंज, टिकारी, नवादा, रजौली, रून्नीसैदपुर, सुरसंड और बाजपट्टी जागांवर एबी फाॅर्म दिलेला नाही. मात्र, आज संध्याकाळी खरे चित्र स्पष्ट होईल. की किती जागांवर मित्रपक्षांमध्ये थेट लढत होणार.
डिहरी और सासाराम या जागांवर काँग्रेस आणि आरजेडी दोघांनी दावा केला आहे. कहलगाव, वैशाली, लालगंज, सिकंदरा, कुटुंबा और वारिसलीगंज या जागांवर राजद-काँग्रेस आमने-सामने आहेत. बेगूसराय जिल्हातील बछवाडा जागेवर काँग्रेस आणि सीपीआई दोघांचे मैदान उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहे. या जागेमुळे सीपीआईने रोसडा, बिहारशरीफ आणि राजापाकड या जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत.
महागठबंधनमधील विकासशील इंसान पार्टी (व्हिआईपी) विरुद्ध जेडीयूचे उमेदवार तारापुर आणि चैनपुर या जागांवर एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहेत. चैनपूरच्या जागेवर राजदने दोन दिवसांपूर्वी बृज किशोर बिंदु या एबी फाॅ र्म दिला. त्यानंतर व्हिआयपीनेने आपले प्रदेश अध्यक्ष बालगोविंद बिंद यांना येथून उमेदवारी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.