Bihar Election update : बिहारमधील भाजपच्या सर्वात मोठ्या नेत्याची उमेदवारीच धोक्यात? विरोधकांनी टाकला डाव...

Supreme Court Petition Filed Against Samrat Choudhary : सम्राट चौधरी यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा दावा सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये करण्यात आला आहे.
Bihar Election update : बिहारमधील भाजपच्या सर्वात मोठ्या नेत्याची उमेदवारीच धोक्यात? विरोधकांनी टाकला डाव...
Published on
Updated on

Impact on Bihar Assembly Election and BJP Image : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडला असून आता दोन दिवसांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पण त्याआधीच बिहारमधील भाजपचा सर्वात मोठा नेताच अडचणीत आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारादरम्यान या नेत्याला मोठे पद (मुख्यमंत्री) देण्याचे संकेत दिले आहेत.

बिहारचे उपमुख्यमंत्री भाजपचे राज्यातील मोठे नेते स्रमाट चौधरी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल झाली आहे. ते तारापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून पहिल्याच टप्प्यात याठिकाणी मतदान झाले आहे. त्यांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे.

चौधरी यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा दावा सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, चौधरी यांनी १९९५ मध्ये एका गुन्हेगारी प्रकरणात आपले वय १५ वर्षे सांगितले होते. पण पाच वर्षांनंतर १९९९ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले वय २५ नमूद केले होते.

Bihar Election update : बिहारमधील भाजपच्या सर्वात मोठ्या नेत्याची उमेदवारीच धोक्यात? विरोधकांनी टाकला डाव...
Maharashtra Government decision : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असा’ निर्णय; फडणवीसांकडून अजितदादा अन् शिंदेंना शह की आणखी काही?

वय लपविल्याचा दावा याचिकेत करण्यात आला असून चौधरी यांनी कोर्टासह निवडणूक आयोगाचीही फसवणूक केल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चौधरी यांनी २०२० आणि २०२५ च्या प्रतिज्ञापत्रातील नमूद केलेल्या वयाचाही ताळमेळ लागत नाही. त्यांनी जाणीवपूर्वक वयाची खोटी माहिती दिली, जेणेकरून त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरेल, सा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रिपदावरून हटवत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली आहे की, ‘निवडणूक आयोगाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले जावेत आणि आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू केली जावी.’ दरम्यान, जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी चौधरी यांच्या वयाचा मुद्दा पुढे आणला होता. तारापूर हत्याकांडामध्ये चौधरी यांनी स्वत:ला अल्पवयीन सांगत दिलासा मिळवला होता, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला होता.

Bihar Election update : बिहारमधील भाजपच्या सर्वात मोठ्या नेत्याची उमेदवारीच धोक्यात? विरोधकांनी टाकला डाव...
CJI Bhushan Gavai : महत्वाच्या प्रकरणात CJI गवईंनी मोदी सरकारला फटकारले; माझ्या निवृत्तीनंतर सुनावणी हवी आहे का?   

दरम्यान, अमित शाह यांनी ३० ऑक्टोबर रोजी तारापूर येथील एका सभेत "सम्राटजी यांना विजयी करा, मोदीजी त्यांना मोठा माणूस बनवतील,’’ असे विधान केले होते. त्यावरून बिहारच्या राजकारणात वादळ उठले होते. सम्राट चौधरी हे एनडीएचे मुख्यमंत्री पदाचे संभाव्य दावेदार असणार, या चर्चांना उधाण आले होते. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हेच पुढेही मुख्यमंत्री राहतील, असे भाजपच्या नेत्यांकडून अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे जूनही त्यावरून तर्कवितर्क लढविले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com