
बातमीत थोडक्यात महत्वाचे :
बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्पडताळणीवरून तेजस्वी यादव यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा गंभीर इशारा दिला असून, निवडणूक प्रक्रियेला ‘फिक्स’ असल्याचा आरोप केला आहे.
तेजस्वी यांनी विरोधी महाआघाडीतील पक्षांशी यासंदर्भात चर्चा करण्याचे संकेत दिले असून, पारदर्शकता नसेल तर निवडणूक लढण्याचा काही फायदा नाही, असे स्पष्ट केले आहे.
घटनेनुसार निवडणूक आयोग प्रक्रियेला पुढे नेणारच असल्याने विरोधक बहिष्कार टाकल्यास त्यांचे प्रतिनिधित्व संपुष्टात येऊ शकते आणि मतदानाचा टक्का घटू शकतो.
Bihar politics 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून राज्यात सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या पुर्नपडताळणीच्या मोहिमेविरोधात विरोधक आता अधिकच आक्रमक झाले आहेत. लाखो मतदारांना मतदारयादीतून वगळले जात असून हे बेकायदेशीर असल्याचा आरोप होत आहे. त्यातच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मोठी घोषणा केली आहे.
तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाच्या मोहिमेवरून थेट विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. अशीच स्थिती राहिली तर निवडणूक लढवून काही फायदा होणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. आयोगाकडून या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात आली नाही तर बिहारमधील विरोधकांची महाआघाडी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार करू शकते, असे मोठे संकेत तेजस्वी यांनी दिले आहेत.
मीडियाशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत आम्ही आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करू. कारण इतर पक्षांना काय हवे आहे, हे लोकांना माहिती व्हायला हवे. जर निवडणूक पारदर्शकपणे होणारच नसेल तर निवडणूकच का घेतली जातेय? बिहारमध्ये भाजपला एक्सटेंशन द्यावे. निवडणूक फिक्स झाली आहे. अशा स्थितीत निवडणुकीत सहभागी होऊ काय फायदा, असे विधान तेजस्वी यांनी केले आहे.
तेजस्वी यादव यांच्याकडून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली जात असली तरी इतर मित्रपक्षांवर त्यांचे गणित अवलंबून आहे. तसेच सर्व विरोधकांनी बहिष्कार टाकला तरी निवडणूक प्रक्रिया थांबू शकत नाही. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. विद्यमान सरकारची मुदत संपण्यापूर्वी आयोगाला निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करावीच लागेल. त्यामुळे विरोधकांनी बहिष्कार टाकला तर निवडणूक अटळ आहे.
विरोधकांनी बहिष्कार टाकला तरी सत्तेत असलेले पक्ष आपले उमेदवार निवडणुकीत उतरवतील. तसेच प्रत्येक मतदारसंघात विरोधकांसोबत नसलेल्या इतर पक्षांचे, अपक्ष उमेदवारही असतील. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर काहीच परिणाम होणार नाही. मात्र, मतदारांच्या मनात निवडणुकीबाबत संभ्रम आणि अविश्वास निर्माण होऊ शकतो. तसेच मतदानाची टक्केवारीही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे निवडणुकीनंतर विरोधकांचे अस्तित्व विधिमंडळात नसेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
प्रश्न: तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर कोणता आरोप केला आहे?
उत्तर: मतदार यादीत लाखो मतदारांना बेकायदेशीरपणे वगळल्याचा.
प्रश्न: तेजस्वी यादव यांचा बहिष्काराचा निर्णय कोणावर अवलंबून आहे?
उत्तर: विरोधी महाआघाडीतील इतर मित्रपक्षांच्या सहमतीवर.
प्रश्न: बहिष्कारामुळे निवडणूक प्रक्रिया थांबू शकते का?
उत्तर: नाही, निवडणूक आयोग प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करतो.
प्रश्न: विरोधक बहिष्कार टाकल्यास काय परिणाम होऊ शकतो?
उत्तर: मतदानाचा टक्का घटू शकतो आणि विरोधकांचे विधानसभेत प्रतिनिधित्व शून्यावर जाऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.