BJP Election News : बिहारमध्ये भाजपची लाट, पण पोटनिवडणुकीत 6 जागांवर पराभवाचा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांचा लेकही पराभूत

By-Election Results: Six Seats Lost by BJP : राजस्थानमधील अंता मतदारसंघात भाजपला धक्का बसला आहे. या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदाराला दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्याने अपात्र ठरले होते. पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवत भाजपला झटका दिला.
Election Commission, BJP, Congress
Election Commission, BJP, CongressSarkarnama
Published on
Updated on

BJP performance bypoll : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यात एनडीएला यश मिळाले आहे. त्यामुळे सर्वत्र भाजप अन् संयुक्त जनता दलावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बिहारसोबतच अन्य सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. पण यापैकी भाजपच्या पदरात केवळ दोन जागा पडल्या आहे. एका जागेवर माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकाचाही पराभव झाला आहे.

काही महिन्यांपूर्वीच विधानसभेची निवडणूक झालेल्या जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात दोन जागांवर पोटनिवडणूक झाली. बडगाम आणि नगरोटा या दोन्ही मतदारसंघात भाजपने उमेदवार उतरवले होते. बडगाममध्ये मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या राजीनाम्यामुळे तर नरगोटामध्ये भाजप आमदाराच्या मृत्यूमुळे पोटनिवडणूक झाली. दोनपैकी नगरोटामध्ये भाजपला विजय मिळाला.

बडगाममध्ये अब्दुल्ला यांना धक्का बसला. या निवडणुकीत पीडीपीने बाजी मारली. तर भाजपचा उमेदवार सहाव्या क्रमांकावर फेकला गेला. नगरोटामध्ये देवयानी राणा विजयी झाल्या. झारखंडमधील घटसिला मतदारसंघात आमदाराच्या मृत्यूमुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. या मतदारसंघात भाजपने माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचे पुत्र बाबूलाल यांना उमेदवारी दिली होती. पण त्यांचा ३८ हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. झारखंड मुक्ती मोर्चाने हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले.

Election Commission, BJP, Congress
Maharashtra Vs Bihar Election Result : महाराष्ट्र अन् बिहारच्या निकालात एवढे साम्य की...; ‘हे’ 6 फॅक्टर वाचा अन् तुम्हीच ठरवा...

मिझोराममधील डंपा मतदारसंघातील निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंट पक्षाने विजय मिळवला. याठिकाणी काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या तर भाजपचा चौथ्या स्थानावर फेकला गेला. ओडिशातील नौपाडा मतदारसंघात भाजपने दणदणीत विजय मिळवला. भाजपचे जय ढोलकिया यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल ८३ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. पंजाबमधील तरन तारण मतदारसंघ आपने पुन्हा जिंकला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार चौथ्या तर भाजपचा थेट पाचव्या स्थानावर राहिला. आप आमदाराच्या राजीनाम्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.

Election Commission, BJP, Congress
Vinod Tawde Bihar News : विनोद तावडे ठरले बिहारचे चाणाक्य; भाजपला दुसऱ्यांदा सत्तेपर्यंत पोहोचवलं, महाराष्ट्रातही होणार कमबॅक!

राजस्थानमधील अंता मतदारसंघात भाजपला धक्का बसला आहे. या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदाराला दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्याने अपात्र ठरले होते. पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवत भाजपला झटका दिला. तेंलगणातही भाजपला विजय मिळवता आला नाही. या राज्यातील ज्युबिली हिल्स मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. तर भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भाजपचा जवळपास ८२ हजार मतांनी पराभव झाला. हा मतदारसंघ भारत राष्ट्र समितीकडे होता. सात पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला दोन जागांचा फायदा झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com