Bihar Election : मोठी राजकीय घडामोड; काँग्रेसबाबत लालूंची रणनीती ठरली, तेजस्वी यादव यांच्याकडून शिक्कामोर्तब

Tejashwi Yadav’s Meeting with Rahul Gandhi and Mallikarjun Kharge : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी दिल्ली काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली.
Rahul Gandhi, Mallikarjun Kharge, Tejashwi Yadav
Rahul Gandhi, Mallikarjun Kharge, Tejashwi YadavSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. त्यासाठी भाजप, संयुक्त जनता दल, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या प्रमुख पक्षांसह इतर पक्षांनीही कंबर कसली आहे. कुणासोबत आघाडी करायची, कुणाला डच्चू द्यायचा यावर रणनीती ठरवली जात आहे. राज्यात प्रामुख्याने काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीची पुन्हा आघाडी होणार की नाही, यावर तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी दिल्ली काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली. या तिघांच्या बैठकीमध्ये आघाडीच्या पुढील रणनीतीवर चर्चा झाली. बैठकीमध्ये आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून निवडणुकीला कसे सामोरे जायचे, यावर चर्चा झाल्याचे समजते.

Rahul Gandhi, Mallikarjun Kharge, Tejashwi Yadav
Robert Vadra News : मोठी बातमी : प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांना अटक होणार? घरापासून चालत गेले ईडी कार्यालयात...

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहे. त्यासाठी जागांचे वाटप आणि इतर मित्रपक्षांशी आघाडीबाबत बैठकीत चर्चा झाली नाही. आता 17 एप्रिल रोजी पटना येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीलाही महत्व प्राप्त झाले आहे आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत तेजस्वी यादव यांनी मीडियाशी बोलताना माहिती दिली.

यादव म्हणाले, बिहारमध्ये 17 एप्रिलला आघाडीची बैठक होणार आहे. निवडणुकीची रणनीती माध्यमांना सांगितली जात नाही. पुढची तयारी केली जात आहे. मजबुतीने एकत्रित पुढे जाण्याचा संकल्प केला आहे. मागील 20 वर्षांपासून असलेल्या सरकारने बिहारसोबत दुजाभाव केला आहे. बिहार सर्वात गरीब राज्य आहे. बिहारमधील उत्पन्न सर्वात कमी आहे. स्थलांतर सर्वाधिक आहे. या मुद्द्यांवर निवडणूक लढणार असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.

Rahul Gandhi, Mallikarjun Kharge, Tejashwi Yadav
Robert Vadra Politics : आता रॉबर्ट वाड्राही राजकारणात एन्ट्री करणार? ; जाणून घ्या, काय केलंय सूचक विधान?

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत बोलताना तेजस्वी यांनी सांगितले की, बैठकीमध्ये सर्व गोष्टी स्पष्ट होतील. तुम्हाला त्रास करून घेण्याची गरज नाही. निवडणुकीआधी निर्णय घ्यायचा की नंतर हे आम्ही ठरवू. नितीश कुमार हायजॅक झाले आहे. निवडणुकीनंतर ते मुख्यमंत्री होणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पण जनता मालक आहे. एनडीएची सत्ता येणार नाही. बिहारमध्ये इंडिया आघाडी सरकार बनवेल, असा विश्वासही यादव यांनी व्यक्त केला.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com