Bihar Election Results : 85 जागा मिळूनही नितीश कुमार हतबल, मुख्यमंत्रिपद मिळणार नाही? भाजपने पलटीचा विषयच संपवला; RJD सोबत गणित जुळणं अवघड!

Nitish Kumar JDU BJP : नितीश कुमार यांच्या पक्षाने मागील वेळेपेक्षा तब्बल दुप्पट जागा मिळवल्या आहेत. मात्र, त्यांना मुख्यमंत्रिपद मिळणे अवघड दिसत असल्याचे चित्र आहे.
Nitish Kumar Amit Shah
Nitish Kumar Amit Shahsarkarnama
Published on
Updated on

Nitish Kumar News : बिहार विधानसभेच्या निवडणुकी निकालात एनडीएची लाट आल्याचे दिसून येत आहे. 243 जागा असलेल्या विधानसभेत तब्बल 208 जागांवर एनडीएची आघाडीवर आहे. विशेष म्हणजे 101 जागा लढणारी भाजप 95 जागांवर आघाडीवर आहे. तर, 101 जागा लढणाऱ्या नितीश कुमारांचा जेडीयू पक्ष 85 जागांवर आघाडीवर आहे.

नितीश कुमार यांच्या पक्षाला चांगले यश मिळाले असले तरी त्यांना मुख्यमंत्रिपद मिळेलच याची शाश्वती नाही. त्यांच्या पक्षाने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून निकाल येताच 'नितीश कुमार कल मुख्यमंत्री थे, आज भी है और कल भी रहेंगे.' या लाईनसह नितीश कुमाराचा फोटो शेअर केला होता. मात्र, अवघ्या दहा मिनिटांमध्येच तो डिलिट केला. त्यामुळे नितीश कुमार यांच्या पक्षाची हतबलता दिसून येत असून त्यांना मुख्यमंत्रिपद मिळणार नसल्याची चर्चा आहे.

'पलटी' मारण्यात माहीर असलेल्या नितीश कुमारांची या निकालामुळे मोठी कोंडी झाली आहे. कारण भाजपची साथ सोडून ते विरोधी पक्षांसोबत जाऊनही सत्ता स्थापन करू शकत नाही. कारण महागठबंधनला अवघ्या 28 जागा मिळताना दिसत आहे. त्यामुळे जेडीयू आणि महागठबंधन युती जरी झाली तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 9 आमदार कमी पडत आहेत.

Nitish Kumar Amit Shah
Bihar Election Result: बिहारच्या निकालात 'तीन' मुद्दे ठरले निर्णायक! SIR विरोधात रान पेटवणाऱ्या योगेंद्र यादवांची पहिली प्रतिक्रिया

भाजप मुख्यमंत्रि‍पदावर दावा करणार

महागठबंधनने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रि‍पदाचे उमेदवार जाहीर केले होते. मात्र, एनडीएने मुख्यमंत्रि‍पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मात्र, एनडीएचे नेते आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे नितीश कुमार हे मुख्यमंत्री असतील असा दावा जेडीयूचे नेते करत आहे. तर, सर्वाधिक जागा भाजपला मिळत असल्याने भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, असा दावा

Nitish Kumar Amit Shah
Bihar Election Results : बिहारमधून धक्कादायक बातमी, तेजस्वी यादव पराभवाच्या छायेत; इतक्या मतांनी पि‍छेहाटीवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com