

Nitish Kumar cabinet RLM Deepak Prakash : राजकारणात कधी, काय घडेल, हे कोणीच सांगू शकत नाही. अशीच एक घटना बिहारच्या राजकारणात घडली असून सध्या त्यावरून वादळ उठले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार नसलेल्या एका तरूणाने कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली अन् पंचायत राज विभागाचा कारभारही सुरू केला. याच तरूण मंत्र्याबाबतची ही घटना आहे.
राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशावाह यांचे पुत्र दीपक प्रकाश हे या घटनेच्या केंद्रस्थानी आहेत. दीपक हे बिहारमधील मतमोजणीदरम्यान अशा एका अपक्ष उमेदवाराचे काऊंटिंग एजंट बनले होते, ज्याचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या उमेदवाराला केवळ 327 मते मिळाली आहे. विशेष म्हणजे हा उमेदवार दीपक यांच्या आईविरोधात मैदानात होता.
सासाराम विधानसभा मतदारसंघातून दीपक यांच्या आई स्नेहलता या राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षाच्या उमेदवार होत्या. त्या या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात रामायण पासवान हे अपक्ष उमेदवारही रिंगणात होते. पासवान यांचे काऊंटिग एजंट म्हणून दीपक यांनी मतमोजणीदिवशी काम केले. दीपक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
आपल्या आईचे काऊंटिग एजंट होण्याऐवजी त्यांच्याविरोधाती अपक्ष उमेदवाराचे काऊंटिंग एजंट बनल्याने दीपक यांच्या भूमिकेवर विरोधकांकडून आता निशाणा साधला जात आहे. काऊंटिंग एजंटचे काम महत्वाचे मानले जाते. उमेदवाराला मिळणाऱ्या मतांकडे बारकाईने लक्ष देणे, त्याची नोंद करणे, मतमोजणी टेबलवर कोणताही अनुचूत प्रकार घडू नये, यासाठी देखरेख ठेवणे आदी कामे त्याला करावी लागतात. त्यामुळे हा मुद्दा सध्या बिहारच्या राजकारणात चर्चेचा बनला आहे.
दीपक प्रकाश यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत विरोधकांकडून उपेंद्र कुशावाह यांना टार्गेट केले जात आहे. त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत आहे. पत्नी आमदार म्हणून निवडून आलेली असताना आमदारही नसलेल्या लेकाला मंत्री बनविण्यात आल्याने टीका होत आहे. एकाच कुटुंबात सर्व पदे घेतल्याने त्यांना विरोधकांनी घेरले आहे. स्वत: कुशवाह हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी निवडणुकीवेळी एनडीएसोबत जाताना आपली राज्यसभेची पुढची टर्मही फिक्स केल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.