Bihar Exit Poll News : बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यातील मतदान आज संपले. दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी तब्बल 67 टक्के मतदान झाले होते. वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यानंतर एक्झिट पोलचेही आकडे समोर आले आहे. 243 जागा असलेल्या बिहार विधानसभेसाठी बहुमताचा जादुई आकडा 122 आहे. मतदानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार तेजस्वी यादव, काँग्रेसच्या महागठबंधनला मोठा फटका बसताना दिसून येत आहे.
'मेट्रोटाई', पिपल पल्स, भास्कर पोल आणि चाणक्य या चार एक्झिट पोलनुसार नितीश कुमार-भाजप यांची युती असलेल्या एनडीएची सत्ता पुन्हा येत असल्याचे दिसत आहे. तर, महागठबंधनचा दारुण पराभव होताना दिसतोय.
मेट्राईजच्या पोलनुसार एनडीएला तब्बल 147 ते 167 च्या दरम्यान जागा मिळत आहेत. तर महागठबंधनला केवळ 70 ते 90 च्या दरम्यान जागा मिळत असल्याचे दिसत आहे. तर, 'पिपल्स पल्स'च्या पोलनुसार एनडीएला 133-159 च्या दरम्यान जागा मिळत आहेत. तर, महागठबंधनला 75 ते 101 च्या दरम्यान जागा मिळत आहेत.
भास्कर पोलनुसार एनडीए पुन्हा एकहाती सत्ता मिळवाताना दिसत आहे. त्यांच्या पोलनुसार 160 जागांपर्यंत महागठबंधन जाण्याच्या शक्यता आहे. त्यांनी 145 ते 160 च्या दरम्यान जागा मिळतील असे पोलमध्ये दाखवले आहे. तर, चाणक्यनुसार एनडीएला 130-138 आणि महागठबंधनला 100-108 च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
एक्झिट पोलनुसार तिसरी आघाडी म्हणून बिहारच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाची वाताहत होताना दिसत आहे. या पक्षाला चाणक्य आणि भास्कर पोलनुसार एकही जागा मिळताना दिसत नाही. तर, बाकी दोन पोलमध्ये केवळ त्यांनी दोन ते तीन जागा मिळत असल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.