Bihar Floor test : पहिल्या चाचणीत नितीश कुमार जिंकले; निकाल...125 विरुद्ध 112

NitishKumar : विधानसभा अध्यक्षांविरुद्ध आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव नितीश कुमार सरकारने 125 विरुद्ध 112 मतांनी जिंकला.
Nitish Kumar
Nitish KumarSarkarnama

Patna : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांना पहिला धक्का दिला आहे. तसेच त्यांचीही चिंता वाढली आहे. विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव सरकारने जिंकला आहे. सरकारच्या बाजूने 125, तर विरोधात 112 सदस्यांनी मतदान केले. (Bihar Floor test)

विधानसभा अध्यक्षांना हटवण्यात सरकारला यश मिळाले असले तरी सरकारच्या बाजूने असलेली तीन मते कुठे गेली, याबाबत सस्पेन्स वाढला आहे. त्याचप्रमाणे विरोधकांचीही दोन मते कमी झाली आहेत. परिणामी, सरकारच्या अविश्वास प्रस्तावावेळी काय होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Nitish Kumar
Supreme Court News : उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडून शिक्कामोर्तब

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांना हटवल्यानंतर नितीश कुमारांनी (Nitish Kumar) सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यावर सध्या भाषणे सुरू आहेत. आरजेडीचे प्रमुख तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला आहे. नितीश कुमारांवर त्यांनी हल्लाबोल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, बहुमतासाठी जेडीयूला 122 चे संख्याबळ आवश्यक आहे. त्यांच्याकडे 127 चे संख्याबळ असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात पहिल्या चाचणीत त्यांच्या बाजूने 125 सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरजेडीचे आमदार चेतन आनंद, नीलम देवी आणि आणखी एका आमदाराला आपल्या बाजूने घेतल्याची चर्चा होती.

R

Nitish Kumar
Maharashtra Politics : काँग्रेसला खिंडार! काँग्रेसचे सहा आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com