Bihar Reservation Amendment Bill : बिहार सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाला राज्यपालांची मंजुरी; आता 65 टक्के आरक्षण...

CM Nitish Kumar On Reservation Amendment Bill : अति मागासवर्गीयांसाठी (EBC) 18% ऐवजी 25% आरक्षण दिले जाणार आहे.
Bihar Reservation Amendment Bill :
Bihar Reservation Amendment Bill :Sarkarnama
Published on
Updated on

Bihar News : बिहारमध्ये आरक्षण वाढवण्यासाठी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी नवीन आरक्षण धोरणाला मंजुरी दिली असून, त्यावर स्वाक्षरी करून विधेयक सरकारला परत केले आहे. आरक्षण विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर हे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले. आता सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि सर्व नामनिर्देशन प्रक्रियेत आरक्षित प्रवर्गातील लोकांना 65 टक्के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. (Latest Marathi News)

Bihar Reservation Amendment Bill :
NCP News : राष्ट्रवादी कुणाची आज सुनावणी; शरद पवार, अजित पवार उपस्थित राहणार ?

नवीन आरक्षण धोरणानुसार, अनुसूचित जातींसाठी (SC) आरक्षण सध्याच्या 16% ऐवजी 20% असेल, ST साठी 1% ऐवजी 2% आरक्षण, मागासवर्गीयांसाठी (OBC) 12% ऐवजी आता 18% आरक्षण असेल आणि अति मागासवर्गीयांसाठी (EBC) 18% ऐवजी 25% आरक्षण दिले जाणार आहे. मागासवर्गीय महिलांना दिलेले 3 टक्के आरक्षण त्याच प्रवर्गाच्या आरक्षणात विलीन करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पूर्वीप्रमाणेच 10 टक्के आरक्षण मिळणार आहे.

Bihar Reservation Amendment Bill :
Rahul Gandhi Cooked Mutton : लालू प्रसाद यादव आणि राहुल गांधींचा फक्कड बेत : हंडीभर मटणावर मारला ताव ! पाहा व्हिडिओ

बिहारमधील सत्ताधारी आघाडी नवीन आरक्षण धोरणाच्या अधिसूचनेच्या प्रतीक्षेत होती. कारण - मागास जातीतील लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमध्ये मोठा वाटा मिळवून देण्याच्या ऐतिहासिक कामगिरीचे श्रेय घेण्यासाठी राज्यव्यापी मोहीम सुरू केली जाऊ शकते. आता राज्यपालांनी आरक्षण दुरुस्ती विधेयक 2023 ला मंजुरी दिल्यानंतर जेडीयू आणि आरजेडीच्या प्रचाराला वेग येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जेडीयूचे आमदार नीरज कुमार म्हणाले, "मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निर्देशानुसार पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र भेटतील आणि या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचण्याच्या मार्गांवर भर देतील आणि त्यांना वाढवलेल्या आरक्षणाचे लाभ सांगतील. या निर्णयामुळे बिहारचा कायापालट कसा होईल, हा येणारा काळच सांगेल."

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com