Rahul Gandhi Cooked Mutton : लालू प्रसाद यादव आणि राहुल गांधींचा फक्कड बेत : हंडीभर मटणावर मारला ताव ! पाहा व्हिडिओ

Congress Politics : राहुल गांधींनी काल लालू यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली
Rahul Gandhi | Lalu Prasad Yadav
Rahul Gandhi | Lalu Prasad Yadav Twitter @Rahul Gandhi

Delhi News : 'भारत जोडो यात्रे'पासून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळतो आहे. ते कधी ट्रक चालवताना दिसतात, तर कधी एखाद्या गॅरेजमध्ये काम करताना दिसतात. त्यांनी दिलेल्या ' नफरत का बाजार बंद, मोहब्बत की दुकाने शुरू' हा नारा तर संपूर्ण देशभरात जणू काही जादूच्या कांडीसारखा फिरतो आहे. देशात सुरू असलेल्या हिंसाचारावर, दु:खावर प्रेमाची फुंकर घालण्याचं काम करताना दिसत आहेत.

अशातच राहुल गांधींनी बिहारचे मुख्यमंत्री लालू यादव यांच्या घरी जाऊन हंडीभर मटण शिजवलं, ते तयार केलं, आणि लालूजींना खाऊ घातलं. याचा व्हिडिओही त्यांनी युट्युब चॅनेलवर शेअर केला आहे. यातून राहुल यांनी लालूंच्या आवडीचं जेवण तयार केल्याची चर्चा आहे. हे सगळं करताना बिहारचे विद्यमान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, लालू यांच्या कन्या मिसा भारती हेदेखील तिथे उपस्थित होते. यात राहुल गांधी चक्क मटण बनवताना दिसत आहे.

- लालू यादव आणि राहुल गांधींच्या राजकीय गप्पा

या भेटीत लालू प्रसाद यादव यांच्या आवडत्या पदार्थांपासून राजकारणापर्यंत अनेक विषयांवर गप्पांची मैफिल रंगली. राहुल गांधींच्या प्रश्नांवर लालू यादव यांनी उत्तरेही दिली. राजनैतिक मसाला म्हणजे काय, काय असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला यावर बोलताना लालू यादव म्हणाले, राजनैतिक मसाला म्हणजे, संघर्ष करा, अन्यायाच्या विरोधात लढा, हाच असतो राजनैतिक मसाला.

जेवणानंतर राहुल गांधी आणि लालू यादव यांनी त्यांच्या कुटुंबीयांशीही राजकारणाच्या सद्य स्थितीवर चर्चा केली. भाजप हिंसाचाराचे आणि विभाजनकारी राजकारण का करते,असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. यावर लालू यादव म्हणाले,सत्तेची भूक मिटली नाही की असे हिंसेचे राजकारण केले जाते.

Rahul Gandhi | Lalu Prasad Yadav
One Nation, One Election : 'एक देश एक निवडणूक' बाबत मनसेकडून भूमिका स्पष्ट ; आमदार राजू पाटील म्हणाले...

तर, 'देशात हिंसेचे राजकारण सुरू आहे. लोकांचे ब्रेनवॉश करून त्यांना हिंसा करण्यास प्रवृत्त केलं जात आहे. हे हिंसेचे राजकारण संपवून आपल्याला एक नवा देश घडवायचा आहे. देशाची संस्कृती, परंपरा आणि विविधतेतून एकतेचा हा देश आपल्याला पुन्हा नव्याने उभा करायचा आहे.' अशा भावना तेजस्वी यादव यांनी व्यक्त केल्या.

राजकारणात येणाऱ्या भावी पिढीलाही लालू यादव यांनी संदेश दिला. तुमच्या आई वडिलांनी आजीने तुम्हाला जे संस्कार दिले तशीच देशाची सेवा करा, देशात हिंसाचाराची नव्हे तर प्रेमाची भावना निर्माण करा, आणि मोहब्बत की दुकाने सुरू करा.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com