पाटणा : बिहारमध्ये राजकीय भूंकप झाला आहे. भाजप आणि जेडीयूची युती तुटली आहे. नितीश कुमार (nitish kumar) आज (बुधवारी) दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 21 महिन्यांत ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 17 वर्षांत ते आठव्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत, बिहारच्या इतिहासात हा एक विक्रम आहे. नितीश यांच्यासोबत आरजेडी नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे धाकटे सुपुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. (Nitish Kumar latest news)
काल (मंगळवारी) संध्याकाळी नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना 7 पक्षांच्या 164 आमदारांचे समर्थन पत्र सादर केले होते. नितीश यांच्यासोबत तेजस्वी यादवही राजभवनात उपस्थित होते. नितीश आणि तेजस्वी यांनी सरकार स्थापनेचा दावा मांडल्यानंतर राजभवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी तेजस्वी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
तेजस्वी म्हणाले, "भाजपचा कोणताही मित्रपक्ष नाही, इतिहास दाखवतो की भाजप ज्या पक्षांशी संबंध ठेवतो त्यांना नष्ट करतो. पंजाब आणि महाराष्ट्रात काय झाले ते आपण पाहिले," भाजपाने जदयू फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. यातून सावध होत पक्ष वाचविला, असा दावा त्यांनी केला आहे.
तर दुसरीकडे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी नितीश कुमार यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला. 2020 मध्ये नितीश भाजपसोबत का होते, असा सवाल प्रसाद यांनी केला. यानंतर 2017 मध्येही ते एकत्र आले. 2019 मधील लोकसभा आणि 2020 मधील विधानसभा निवडणूकही त्यांनी लढवली. आता असं काय बिघडलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजप खासदार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ट्विट केले असून, 2024 मध्ये भाजप प्रचंड बहुमताने जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. “भाजपने नितीश कुमार यांच्या संमतीशिवाय आरसीपी सिंह यांना मंत्री बनवले. भाजपला जेडीयू तोडायची होती किंवा ते तोडण्यासाठी निमित्त शोधत होता हेही खोटे आहे. 2024 मध्ये भाजप प्रचंड बहुमताने जिंकेल”, असे सुशील कुमार मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.